Share

“यशवंत जाधव यांचे ‘मातोश्री’ प्रेम डोळ्यात पाणी आणणारे”, भातखळकरांचे टीकास्त्र

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेना नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav), त्यांचे सहकारी आणि बीएमसी कंत्राटदार यांच्या निवासस्थानी २५ फेब्रुवारी रोजी आयकर विभागाला काही महत्त्वाचे पुरावे मिळाले होते. तपासात जाधव यांनी केलेल्या कोट्यवधींच्या संशयास्पद नोंदी असलेली डायरीही विभागाला सापडली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, डायरीतील एका नोंदीमध्ये मातोश्रीला ५० लाख रुपयांचे घड्याळ पाठवल्याचा उल्लेख आहे आणि दुसऱ्या नोंदीमध्ये गुढीपाडव्याला मातोश्रीला २ कोटी रुपयांची भेट पाठवल्याचा उल्लेख आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून आता भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’ ला दोन कोटी रोकड आणि ५० लाखांचे घड्याळ दिल्याची डायरीत नोंद सापडली आहे. जाधव म्हणतात, ‘मातोश्री’ म्हणजे माझी आई.’ असू शकते हो, पण कमवलेल्या ३०० कोटी पैकी आणखी किती ‘मातोश्री’ला दिले हेही सांगा, बाकी आम्ही समजून घेऊ.’

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘तुमच्यासारख्या शिवसैनिकांना त्रास देऊ नका,मी त्यांची जबाबदारी घेतो, मला अटक करा, असे उद्धव ठाकरे म्हणलेलेच आहेत.’ तसेच यशवंत जाधव यांचे ‘मातोश्री’ प्रेम डोळ्यात पाणी आणणारे आहे, असा खोचक टोलाही भातखळकरांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!