Share

चमच्यांचे ‘हे’ विधान ऐकून मोदींची दोन तासांची झोपही उडाली असेल- संजय राऊत

Published On: 

मुंबई : भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) दिवसातून २२ तास जागे असतात. ते केवळ २ तास झोपतात. सध्या नरेंद्र मोदी एक प्रयोग करत असून तो म्हणजे त्यांना झोपावं लागणार नाही, असे वक्तव्य केले. यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना रोखठोखच्या माध्यमातून मोदी सरकारवर टीका केली आहे. तसेच ‘मोदी २२ तास काम करतात. उरलेले दोन तास झोपही पंतप्रधानांना येऊ नये यावर संशोधन सुरू आहे’, चमच्यांचे हे विधान ऐकून पंतप्रधान मोदींची दोन तासांची झोपही उडाली असेल, असेही राऊत म्हणाले.

लेखात राऊत म्हणाले आहेत की,‘महाराष्ट्राचे चंद्रकांत पाटील यांनी अंधभक्तीच्या चिपळ्या वाजवीत सांगितले, नरेंद्र मोदी हे अखंड काम करतात. ते बावीस तास काम करतात व फक्त दोन तास झोपतात. आता ही दोन तासही झोप येऊ नये म्हणून प्रयत्न सुरू आहेत. पाटलांची ही विधाने ऐकून दिल्लीत पंतप्रधान मोदींची दोन तासांची झोपही उडाली असेल. भक्तांना आणि चमच्यांना हे इतके मानसिक बळ येते कोठून, हाच संशोधनाचा विषय आहे.’

दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘मोदींना खिचडी आवडते म्हणून भक्तांनाही खिचडी आवडू लागली. मोदींनी चहा विकला म्हणून भक्तांनी चहाची विक्री सुरू केली. या भक्तीस तोड नाही. आता तर कोथरुडचे पाटील मोदींच्या झोपेवर संशोधन करायला निघाले. मोदी यापुढे २४ तास जागे राहतील. म्हणजे त्यांचे भक्तही झोपणार नाहीत.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!