Share

औरंगाबाद काँग्रेस नेत्यांची शिवसेनेवर टीका; मनपा निवडणुकीतील आघाडीवर प्रश्नचिन्ह

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद– प्रदेश नेत्यांच्या भूमिकेनंतर औरंगाबादमधील स्थानिक काँग्रेस नेते देखील आता ‘संभाजीनगर’ नामकरणाला विरोध करत आहे. औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना, भाजप आणि मनसेने औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याचा मुद्दा प्रतिष्ठेचा केलाय. मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने स्थानिक काँग्रेस नेत्यांना शिवसेनेच्या विरोधात भूमिका घेता येत नव्हती. मात्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी अशा नामांतराला काँग्रेसचा विरोध असेल हे स्पष्ट केले. त्यानंतर आता स्थानिक नेत्यांनी देखील शिवसेना आणि भाजपच्या या भूमिकेला विरोध दर्शवला आहे.

काँग्रेसचे शहरातील नेते माजी नगरसेवक अफसर खान यांनी मतदारांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या अशा मुद्द्यांचा मनपा निवडणुकीवर परिणाम होणार नसल्याचं म्हटलंय. निवडणुकीच्या काळातच शिवसेना आणि भाजपला संभाजीनगरचा मुद्दा आठवत असल्याची टीकाही त्यांनी केली. महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेनंतर पहिल्यांदाच स्थानिक काँग्रेस नेते शिवसेनेच्या विरोधात बोलत आहे. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणूक महाविकासआघाडी एकत्र लढेल का? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

कारवाई करण्याची मागणी

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरात ‘सुपर संभाजीनगर’चे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यानंतरच खऱ्या अर्थाने या वादाला सुरुवात झालीये. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांच्या पुढाकारातूनच शहरात संभाजीनगरचे बोर्ड लावण्यात आले आहेत. हे बोर्ड लावणा-यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी अफसर खान यांनी केलीये.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!