🕒 1 min read
मुंबई- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बॉलिवूड इंडस्ट्री उत्तर प्रदेशला घेऊन जाणार असल्याच्या चर्चेवरून जोरदार राजकारण रंगले आहे. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना योगी आदित्यनाथ यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. आम्ही काहीच घेऊन जायला आलो नाही. आम्ही तर नवी फिल्मसिटी तयार करण्यासाठी आलो आहोत, असं सांगतानाच बॉलिवूड मुंबईतच राहिल, अशी ग्वाही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी उत्तर प्रदेशातही फिल्म सिटी उभारण्याची घोषणा केली होती. दरम्यान, आता फिल्म सिटीवरून राजकारणाला सुरूवात झाली आहे. राज्यातील सत्ताधाऱ्यांनी यावरून योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. दरम्यान, आम्ही काहीच घेऊन जायला आलो नाही. आम्ही तर नवी फिल्मसिटी तयार करण्यासाठी आलो आहोत, असं सांगतानाच बॉलिवूड मुंबईतच राहिल, अशी ग्वाही योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे.
बॉलिवूडमधील दिग्गजांचा अनुभव घेऊन त्यांच्या सूचनेनुसार नवं मॉडल तयार करायचं आहे. वर्डक्लास फिल्मसिटी तयार करण्यासाठी फिल्मी दुनियेच्या लोकांशी चर्चा केली. आम्ही कुणाचं काही घेऊन जाणार नाही. आम्हाला नव निर्मिती करायची आहे. त्यासाठी आलो आहोत, असंही योगी आदित्यनाथ यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
‘…तोपर्यंत मराठा आरक्षणाला चालना मिळणार नाही’
‘जलयुक्त शिवार’च्या चौकशीतून काही निष्पन्न होणार नाही; राम शिंदेंना गाढा विश्वास
‘वेळ पडल्यास मी सतरंज्या उचलण्यासही तयार’
बॉलिवूडचा दर्जा कोणीही संपवू शकत नाही, नवाब मलिकांची योगींवर टीका!
कट्टर राजकीय विरोधक कुल-थोरातांमध्ये ‘चाय पे चर्चा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

