मुंबई : जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत झालेल्या कामांची खुली चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून फक्त कामांची संख्या अधिक असल्याने कोणती कामे खुल्या चौकशीसाठी निवडणे आवश्यक आहे, याचा शोध घेण्यासाठी सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव विजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे.
दरम्यान, यावर भाजपाचे माजी मंत्री राम शिंदे यांनी पुण्यात प्रतिक्रिया दिली.तत्कालीन राज्य सरकारच्या काळात जलयुक्त शिवार अभियान सर्वात यशस्वी सर्वात ठरले होते. या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा झाला. पण आता सूडबुद्धी आणि आकसबुद्धीने जलयुक्त शिवार अभियानाची चौकशी करण्याचे काम हे महाविकास आघाडी सरकार करत आहे असा आरोप त्यांनी केला.
निर्णय घेताना आमच्यासोबत त्यावेळी शिवसेना होती. तेव्हा त्यांनी कोणत्याही निर्णयाला विरोध केला नाही. त्यामुळे आता शिवसेनेची संशयास्पद भूमिका असल्याचे दिसत आहे. पण आम्ही मात्र चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत. या चौकशीतून काही निष्पन्न होणार नाही असं देखील राम शिंदे म्हणाले.
दरम्यान, स्थगिती, चौकशी, दमनकारी नीती याच्या बाहेर न निघालेल्या सरकारकडून आणखी काय अपेक्षा करणार? महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वांत निष्क्रिय सरकारने आता आणखी एका चौकशीची घोषणा करून शेतकऱ्यांच्या लोकचळवळीचा एकप्रकारे अपमानच केला आहे. तथापि सरकारने हवी ती चौकशी करावी, त्यातून सत्यच बाहेर येईल, असे भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ठाकरे सरकारबाबत असणारी नाराजी आगामी निवडणुकीतून दाखवून देईल : दानवे
- ‘…पण मुस्लीम उमेदवारला तिकीट देणार नाही’ भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य
- शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला, लोकसेवा आयोगाच्या परिक्षा होणार कधी?ठाकरे सरकारवर दानवे बरसले
- ‘ही सरकारच्या कामांची वर्षपूर्ती नव्हे तर लोकोपयोगी कामांचे विद्यमान सरकारने घातलेले वर्षश्राद्ध’


