Share

बॉलिवूडचा दर्जा कोणीही संपवू शकत नाही, नवाब मलिकांची योगींवर टीका!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई:- योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशात फिल्म सिटी तयार करण्याची गोष्ट करत आहेत ही चांगलीच बाब आहे. परंतु हे समजून घ्या की, १०० वर्षांपासून मुंबईला मिळालेला बॉलिवूडचा दर्जा संपणार नाही. लोकं पूर्णपणे अन्य राज्यांमध्ये निघून जातील, पण बॉलिवूडचा दर्जा कोणी संपवू शकणार नाही, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशात मुंबईच्या धर्तीवर चित्रनगरी उभारण्याची योजना असून यावरूनच राजकारणही तापले आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी उत्तर प्रदेशातही फिल्म सिटी उभारण्याची घोषणा केली होती. दरम्यान, आता फिल्म सिटीवरून राजकारणाला सुरूवात झाली आहे. राज्यातील सत्ताधाऱ्यांनी यावरून योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी बॉलिवूडचा दर्जा कोणीही संपवू शकत नसल्याचे म्हणत योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, अशोक चव्हाण यांनी देखील योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे. "भाजपच्या पाच वर्षांच्या काळात दिवसाढवळ्या महाराष्ट्रातील अनेक उद्योग अन् कार्यालये गुजरातला पळवण्यात आली. आता महाराष्ट्रातले सरकार बदलले तर उत्तरप्रदेश सरकारच्या नावाखाली बॉलीवूडचे लचके तोडण्याची पटकथा तयार झालेली दिसते. पण भाजपच्या काळात जे झाले ते आम्ही पुन्हा घडू देणार नाही, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!