🕒 1 min read
पुणे : पुणे जिल्ह्यातील राजकारणातील दोन मोठे घराणे म्हणजे थोरात आणि कुल मात्र हे दोन्ही घराणे कट्टर राजकीय विरोधक. मात्र काल पदवीधर निवडणुकीच्या मतदानावेळी दौंडचे आमदार राहुल कुल व माजी आमदार रमेश थोरात यांचे पुत्र गणेश थोरात यांनी केडगाव मतदान केंद्राबाहेर आज चाय पे चर्चा केली. या अनपेक्षित चर्चेने उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती.
विधान परिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाचे मंगळवारी मतदान होते. महाविकास आघाडी व भाजपने या निवडणुकीत मोठी मोर्चेबांधणी केली. त्यामुळे प्रथमच या निवडणुकीत चुरस दिसली. पक्षाच्या पदाधिका-यांकडून मतदान प्रक्रियेकडे बारीक लक्ष ठेवण्यात येत होते. राहुल कुल, रमेश थोरात, गणेश थोरात व अन्य पदाधिकारी मतदार केंद्रांना भेटी देऊन तेथील मतदान प्रक्रियेची माहिती घेत होते.
केडगाव येथील मतदान केंद्रावर राहुल कुल व गणेश थोरात यांची भेट झाली. आमदार कुल यांनी थोरात यांना चहा घेण्याची विनंती केली. थोरात यांनीही ती मान्य केली. दोघेही भाजपच्या बुथमध्ये बसले. राजकारण सोडून कौटुंबिक व आरोग्यविषयक चर्चा झाली. काय चर्चा चालू आहे. हे कार्यकर्ते कान देऊन ऐकत होते.
यापुर्वी राहुल कुल यांनी एका लग्न समारंभात गणेश थोरात यांना फेटा बांधला होता. कुल यांना कोरोनाचा संसर्ग झाला तेव्हा गणेश थोरात यांनी कुल यांना लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या. या दोन्ही घटनांमुळे या घराण्यांमधील राजकीय वैर कमी होईल अशी आशा कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ठाकरे सरकारबाबत असणारी नाराजी आगामी निवडणुकीतून दाखवून देईल : दानवे
- ‘…पण मुस्लीम उमेदवारला तिकीट देणार नाही’ भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य
- शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला, लोकसेवा आयोगाच्या परिक्षा होणार कधी?ठाकरे सरकारवर दानवे बरसले
- ‘ही सरकारच्या कामांची वर्षपूर्ती नव्हे तर लोकोपयोगी कामांचे विद्यमान सरकारने घातलेले वर्षश्राद्ध’
- केंद्राकडून नेमके किती येणे बाकी आहे यावर आधी एकमत करा; दरेकरांचा सत्ताधाऱ्यांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

