🕒 1 min read
मुंबई : राज्यपाल नामनिर्देशित १२ जागांसाठी शिवसेनेतर्फे 4 उमेदवारांची यादी पाठवण्यात आली आहे. महाविकास आघाडीत सध्या तीन पक्ष आहेत. म्हणून प्रत्येकी चार – चार जागा वाट्याला आल्या आहेत.या पार्श्वभूमीवर अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने कालच शिवसेनेत प्रवेश केला आहे.
विधानपरिषदेची उमेदवारी काँग्रेस सोडून शिवसेनेत आलेल्या उर्मिलाला दिल्यामुळे अनेक निष्ठावंतांवर अन्याय केल्याचा आरोप भाजपने केला आहे. तर, काही निष्ठावंत नाराज असल्याच्या चर्चा देखील होत्या. यासंदर्भातच एबीपी माझाच्या मुलाखतीमध्ये उर्मिलाला प्रश्न केला असता तिने दिलेल्या उत्तरामुळे जोरदार चर्चा रंगल्या आहेत.
वेळ पडल्यास मी सतरंज्या उचलण्यासही तयार आहे असं वक्तव्य आज उर्मिला मातोंडकर यांनी केलं आहे. मी शिवसैनिक म्हणून काम करायचं आहे. मी शिवसेनेत लोकांची कामं करण्यासाठी आली आहेत. आज माझी ओळख शिवसैनिक अशीच आहे. शिवसेनेत आल्यानंतर मला शिवसैनिकांच्या खांद्याला खांदा लावून काम करायला आवडेल. कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्याच उचलायच्या अशी चर्चा कायम होत असते.
त्याबाबत उर्मिला मातोंडकर यांना विचारलं असता मी प्रसंगी सतरंज्या उचलण्यासही तयार आहे असं उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे. कार्यकर्त्यांना सोबत घेऊनच पुढे जायचं आहे. आज मी माझी ओळख ही शिवसैनिक अशी करुन देते आहे तशीच ती आहे. मी एखाद्या सामान्य कार्यकर्त्याप्रमाणेच काम करणार आहे असंही उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
‘हे राज्य सरकारच्या अकलेचे दिवाळे निघाल्याचे आणखी एक उदाहरण…’
शेती-माती, क्रिकेटनंतर तैमूरला जडला नवा छंद
‘अजानच्या बाबतीत बोलणाऱ्यांनी स्वतःच्या बुडाखाली काय आणि किती जळतंय हे बघावं’
औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणुकीत बीड जिल्ह्यात झाले ‘एवढे’ मतदान
‘शिवसेनेनं हिंदुत्वास सोडचिट्ठी दिली असं जे म्हणतात, त्यांच्या दाताडांत ‘ईद’च्या शिरकुरम्याची, बिर्याणीची शिते…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

