मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट आणि रणबीर कपूर हे येत्या 14 ते 15 एप्रिल दरम्यान लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. त्यांनी ज्यादिवशी आपल्या लग्नाची बातमी सर्वांना सांगितली आहे. त्या दिवसापासून त्यांचे चाहते खूप खूश असल्याचं पाहायला मिळतं आहे. याव्यतिरिक्त आलिया आणि रणबीरच्या लग्नाला घेऊन बॉलिवूडमधील इतर कलाकारही उत्सुक असल्याचं दिसून येतं आहे.
तर अशातच बॉलिवूडचे दिग्दर्शक इम्तियाज अलीने आलिया आणि रणबीरच्या लग्नावर एक वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, रणबीर कपूर आणि आलिया भट हे एकमेकांसारखेच आहेत. त्यांची आप-आपसात मैत्री होण्याआधीच ते एकसारख्या आत्मियतेचे असल्याचे दिसून येत असल्याचंही अली यांनी म्हटलं आहे. हा सगळा संवाद त्यांनी टाईम्स ऑफ इंडियासोबत साधला असल्याचं समजतं आहे.
तसेच, “मी ज्या कलाकारांसोबत काम केले आहे त्यांपैकी रणबीर आणि आलियासारखे कोणीही नाही. एक अभिनेता म्हणून एकसारखे होण्यासाठी, तुम्ही लोकांसारखेच असले पाहिजे. तुम्हाला त्यांच्या विचारांमध्ये जुळवून घेणे आवश्यक आहे आणि तेच या दोघांच्या बाबतीत आहे, असंही इम्तियाज अलीने म्हणाले आहेत.
दरम्यान, रणबीर आणि आलियाच्या लग्नावर बॉलिवूड अभिनेता संजय दत्तनेही आपलं मत मांडलं होतं. त्यावेळी तो म्हणाला होता की, दोघांनी लवकर लग्न करा, बाळ जन्माला घाला आणि आनंदी राहा, असा सल्ला त्यावेळी त्याने प्रसार माध्यमांशी बोलताना दिला होता.
महत्वाच्या बातम्या :
IPL 2022 : पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये रोहितला खुणावतोय ‘विराट’ विक्रम; आज फक्त २५ धावा करताच….
गुणरत्न सदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
मोठी बातमी! नवाब मलिकांची संपत्ती ईडीकडून जप्त
IPL 2022 : “जोपर्यंत RCB आयपीएल ट्रॉफी जिंकत नाही, तोपर्यंत…”, भर मैदानात ‘तिनं’ घेतली शपथ!
“राऊत राष्ट्रवादीचा भोंगा”; संदीप देशपांडे यांचा राऊतांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

