Share

शिक्षणासाठी होडीतून प्रवास; फोटो व्हायरल झाल्यानंतर राहुल गांधींनी केली ‘ही’ मोठी मदत

Published On: 

गोरखपूर : कोरोना काळात शाळा पुर्णपणे बंद होत्या. ऑनलाईन क्लास सुविधा करत मुलांना शिक्षण देण्यात आला. मात्र, उत्तर प्रदेशासहीत अनेक राज्यांत शाळा हळूहळू उघडण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासचीही परवानगी देण्यात आलीय. शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी अनेक शक्कल लढवतात. उत्तर प्रदेशामधील गोरखपूरच्या बहरामपूरच्या अकरामध्ये शिकत असणाऱ्या एका मुलीचा बोटीने महाविद्यालयात जातानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या फोटोमध्ये महाविद्यालयाच्या युनिफॉर्ममध्ये असलेली मुलगी संध्या निषाद ही होडीमधून वल्हवत शाळेचा रस्ता पार करताना दिसत आहे. तिच्या या कृत्यावरुन तिला शिकण्याची किती गोडी आहे हे दिसून येत आहे. तिच्या शिक्षणाच्या गोडीची दखल काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतली आहे. राहुल गांधी यांनी संध्या निषाद हिच्या पुढील शिक्षणाचा सर्व खर्च उचलण्याचं आश्वासन दिलं आहे. राहुल गांधी यांनी संध्या हिच्या वडिलांशी फोनवरुन संवाद साधला. संध्याला शिक्षणासाठी आवश्यक ती सर्व मदत पुरवली जाईल, असेही आश्वासन यावेळी राहुल गांधींनी दिले आहे.

मुलीला उच्च शिक्षण देण्याची गळ घालताना ऑनलाईन क्लाससाठी संध्याला अँड्राईड फोन दिला जाईल, असं राहुल गांधी यांनी सांगितलंय. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष निर्मला पासवान यांच्याद्वारे हा फोन संध्याकडे पोहचवला जाईल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!