Share

मुंबई : फेरीवाल्यांचा उच्छाद आटोक्यात आणावाच लागेल; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य

Published On: 

मुंबई : ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर एका फेरीवाल्याने जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांची दोन बोटे कापली गेली असून त्यांच्या दुसऱ्या हाताला आणि डोक्यावर देखील जबर मार लागला असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता.

या घटनेनंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक लक्ष्यवेधी मत व्यक्त केले आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विविध विकास कामांचे ऑनलाइन लोकार्पण मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी फेरीवाल्यांच्या मुद्यावर भाष्य केले.

ते म्हणाले,  ठाण्यात मध्यंतरती जी घटना घडली. महिलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आपली आहे. त्यात महिला पोलीस देखील आल्या. जो कोणी कायदा हातात घेत असेल त्याच्या बाबतीत दया माया दाखवून चालणार नाही. फेरीवाल्यांच्या उच्छाद आटोक्यात आणण्यासाठी कायदा राबवावा लागेल, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवार केले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी कल्पिता पिंपळे यांना फोन करून त्यांच्यापाठीमागे सरकार खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास व्यक्त केला होता. तुमच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा होईल. ते आमच्यावर सोडा. त्याची तुम्ही चिंता करू नका. तुम्ही फक्त ठणठणीत बऱ्या व्हा, असा शब्दच ठाकरे यांनी कल्पिता पिंपळे यांना दिला आहे.

‘आरोपीला शिक्षा करण्याची चिंता करू नका. तुम्ही फक्त लवकर बऱ्या व्हा. मला रोज रिपोर्ट येत असतात. उगाच डिस्टर्ब नको म्हणून मी लवकर संपर्क साधला नाही. पण मला माहिती मिळत असते. तुम्ही लवकर बऱ्या व्हा. बाकी बघू. आरोपींना तर कडक शिक्षा होणार. तुम्ही लवकर ठणठणीत बऱ्या व्हा,’ असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!