Share

भाजपचे दोन फायरब्रँड नेते पवारांच्या बारामतीत येवून डागणार तोफ

Published On: 

बारामती : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या होम ग्राउंड आता भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या व आमदार गोपीचंद पडळकर हे दोन फायरब्रँड नेते एकत्रित येवून धडाडणार असल्याची माहिती सध्या मिळत आहे. तसेच त्यांच्यासोबत माजी मंत्री बाळा भेगडे देखील असणार आहेत. अशी माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे यांनी दिली आहे.

सोमय्या यांनी अनेकांच्या मालमत्ता, भ्रष्टाचाराची भांडाफोड केली आहे. तर आमदार पडळकर हे त्यांच्या बिनधास्त वक्तव्यासाठी प्रसिध्द आहेत. त्यामुळे सोमय्या आणि पडळकर प्रथमच बारामतीत एकत्रित येणार आहेत. हे दोन्ही प्रसिध्द नेते माध्यमांशी संवाद साधणार आहेत.

दरम्यान सोमय्या यांनी सध्या प्रादेशिक परिवहन अधिकारी असलेल्या बजरंग खरमाटे यांना लक्ष्य केलेले आहे. त्यांच्या संपत्तीबाबत माहिती गोळा करण्यासाठी सोमय्या यांनी नुकतीच सांगली येथे काही दिवसांपूर्वी भेट दिली आहे. सांगली येथे सोमय्या यांनी काही सेल्फीही काढलेले होते. आता सांगली पाठोपाठ याच पार्श्वभूमीवर सोमय्या बारामती भेटीला येत आहेत. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधान आले असल्याचे पहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!