पंढरपूर : अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. पंढरपुरात मतमोजणीला सुरुवात झाली आहे. काही वेळापूर्वी पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली होती. आता ईव्हीएम मतमोजणीलाही सुरुवात झाली आहे. तिसऱ्या फेरीचे निकाल समोर येत आहेत.
राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. राष्ट्रवादीने भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली असून भाजपने त्यांच्याविरोधात समाधान आवताडे यांना उभं केलं आहे. वंचित बहुजन आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह एकूण 19 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरले असले तरी खरी लढतही भालके आणि आवताडेंमध्येच होताना दिसत आहे.
भारतनानांच्या निधनामुळे त्यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांच्यामागे सहानुभूती असल्याने त्याचा त्यांना मोठा फायदा होईल अशी शक्यता वर्तवली जात असली तरी समाधान आवताडे यांनी आघाडी घेतली आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी आघाडी मिळेल अशी शक्यता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वर्तवली होती.
मात्र, १७ व्या फेरीपर्यंत पंढरपूर शहरासह तालुक्यातील गावांची मतमोजणी पार पडली असून भाजपचे समाधान आवताडे यांनी आघाडी घेतली आहे. यामुळे भालकेंसह राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये भालकेंनी आघाडी घेतली होती. यानंतर आवताडेंनी भगीरथ भालके यांना पिछाडीवर टाकलं असून १८ व्या फेरीअखेर आवताडेंनी आपली आघाडी कायम ठेवली आहे. भाजपच्या समाधान आवताडे यांनी १८ व्या फेरीअखेर १०६६ मतांनी आघाडी घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- माजी नगराध्यक्ष रोहिदास पाटील आणि पत्नी निर्मला पाटील यांचे एकाच दिवशी निधन
- चर्चा काहीही होऊ द्या, ममताच जिंकणार – संजय राऊत
- फक्त ‘या’ दोन राज्यांमध्ये सत्ताबदल होईल; संजय राऊत यांचा ‘पोल’ खरा ठरणार ?
- ‘आत्मनिर्भर होण्याचा उद्देश आहे, त्यामुळे देश अडचणीत असताना पंतप्रधान मदतीला येणार नाहीत’
- ‘देश संकटात राजकारणावर काय बोलायचे, कॉंग्रेस नेते आज टीव्हीवर बोलणार नाहीत’


