Share

‘आत्मनिर्भर होण्याचा उद्देश आहे, त्यामुळे देश अडचणीत असताना पंतप्रधान मदतीला येणार नाहीत’

Published On: 

दिल्ली : देशात कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. गेल्यावर्षीच्या अखेरीस कोरोनाची स्थिती आटोक्यात आल्यानंतर दैनंदिन जनजीवन सुरळीत झाले होते. मात्र, मार्च महिन्यापासून कोरोनाने हाहाकार माजवण्यास सुरुवात केली असून देशात दररोज रेकॉर्ड ब्रेक रुग्णांची नोंद करण्यात येत आहे.

काल देशभरात चार लाखांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून अनेक बड्या देशांनी भारतातील स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. देशात ऑक्सिजन, बेड्स, औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्ण अक्षरशः तडफडून जीव सोडत आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील यावरून मोदी सरकारला चांगलंच झापलं असून काँग्रेसने देखील हल्लाबोल केला आहे.

‘आत्मनिर्भर होण्याचा उद्देश आहे. कोणीही आता आपल्या मदतीला येणार नाही, पंतप्रधान सुद्धा नाहीत. देशातील कोरोनाची स्थिती आता नियंत्रणाबाहेर गेली आहे आणि केंद्र सरकार आता त्याची जबाबदारी राज्यांवर ढकलत आहे. वैज्ञानिकांनी वारंवार सूचना देऊनही सुरुवातील कोरोनाचा धोका ओळखायला मोदी सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे.’ अशी टीका काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांनी केली आहे.

यासोबतच, ‘भारतातील कोरोना परिस्थितीवरून संपूर्ण जगभरात चिंता व्यक्त केली जात असताना मोदी सरकार मात्र आपली प्रतिमा निर्माण करण्याच्या कामात व्यस्त आहे.’ असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या    

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!