Share

“केंद्राचे अपयश झाकण्यासाठी भागवत कराड अजित दादांवर टीका करत आहेत”, रुपाली पाटलांची टीका

Published On: 

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी देशाचा अर्थसंकल्प (Budget) संसदेत सादर केले आहे. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री महाराष्ट्राचे असूनही राज्याला अर्थसंकल्पातून काहीही मिळालेलं नसल्याची टीका केली. त्यानंतर केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड (Union Minister of State for Finance Bhagwat Karad) यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिले होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी भागवत कराड यांच्यावर टीका केली आहे.

रुपाली पाटील ठोंबरे ट्विट करत म्हणाल्या, ‘केंद्रात महाराष्ट्रातील आठ मंत्री असताना व भूमिपुत्र अर्थराज्यमंत्री असताना महाराष्ट्रासाठी विशेष काही मिळेल ही अपेक्षा होती ती फोल व अपयशी ठरली. अपयश झाकण्यासाठी भागवत कराड साहेब अजित दादांवर टीका करत आहेत.’ अशी टीका रुपाली पाटलांनी भागवत कराड यांच्यावर केली आहे.

भागवत कराड म्हणाले होते, केंद्र सरकारने अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यात राज्यानुसार कोणत्याही तरतुदी करण्यात आल्या नाहीत. तर विविध खात्यांनुसार तरतुदी करण्यात आल्या आहेत. पण आम्ही महाराष्ट्रातून आलेलो आहोत. राज्याला काय लागणार याची आम्हाला कल्पना आहे. त्यामुळे केंद्रातील राज्यातले जेवढे मंत्री असतील तेवढे प्रयत्न करून बजेटमधून महाराष्ट्राला भरघोस वाटा मिळावा यासाठी प्रयत्न करतील’ असे भागवत कराड म्हणाले.

‘तसेच अजित पवारांना माझा प्रश्न आहे की, अर्थसंकल्प जाहीर झाला त्यापूर्वीच्या दोन बैठकांमध्ये मुख्यमंत्री किंवा राज्याच्या अर्थमंत्र्यांनी येणं अपेक्षित होतं. पण त्यांनी कुणालाही पाठवलं नाही. सचिव पदावरील अधिकारी एकदा आले होते, पण त्यांना काहीही मांडता आलं नाही. तसेच राज्यातले रखडलेले प्रकल्प किंवा इतर मागण्याही त्यांना मांडता आल्या नाहीत. त्यामुळे किमान राज्यमंत्र्यांना तरी पाठवणे गरजेचं होतं. तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीतही कोणी आले नाही.’ असे भागवत कराड म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!