मुंबई : आयपीलच्या १५व्या हंगामाची सुरुवात लवकरच मार्चमध्ये होणार आहे. यंदाचे आयपीएल अजूनही विशेष असणार आहे कारण दोन नवे संघ शामिल झाले आहेत. यात लखनऊ सुपरजाईंट्स आणि अहमदाबादचा समावेश आहे. लखनऊचे नेतृत्व के एल राहुल तर अह्मदाबादचे नेतृत्व हार्दिक पंड्याकडे देण्यात आले आहे. हार्दिकने आपण कर्णधारपद कसे सांभाळणार यावर प्रतिक्रिया दिली आहे.
अहमदाबाद संघाने आयोजित केलेल्या संभाषणात हार्दिक म्हणाला, ” मी विराटकडून आक्रमकता आणि उत्कटता शिकेल, त्याची ऊर्जा जबरदस्त आहे. प्रत्येक परिस्थितीत संयम, शांतता आणि सामान्य राहण्याची कला मी माही भाईकडून शिकेन आणि खेळाडूंना मोकळेपणाने खेळण्याचे स्वातंत्र्य देणे मी रोहितकडून शिकण्याचा प्रयत्न करणार आहे.” हार्दिक महेंद्रसिंग धोनी , विराट कोहली आणि रोहित शर्मा या तिघांच्या कर्णधारपदात खेळाला आहे.
हार्दिक पंड्याने याआधी आंतरराष्ट्रीय स्तरावर कधीही नेतृत्व केलेले आहे. त्याने फक्त अंडर १६ मध्ये बडोदा संघाचे कर्णधारपद भूषवले होते. अहमदाबादचा कर्णधार म्हणून हार्दिक करिअरची नवीन इनींग सुरु करणार आहे. बऱ्याच काळापासून गोलंदाजीपासून लांब आहे. तो आयपीएलमध्ये पुन्हा अष्टपैलू खेळाडू म्हणून उतरणार का याकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अर्थसंकल्प सर्वसामान्यांचा नसून श्रीमंतांचा; अब्दुल सत्तारांचा मोदी सरकारवर निशाणा!
- समीर वानखेडे यांना मोठा धक्का; मुंबईतील बारचा परवाना रद्द
- ‘रुको जरा सबर करो…’, म्हणणाऱ्या हिंदुस्थानी भाऊच्या अडचणीत वाढ; नागपूर पोलीस करणार अटक
- Kaccha badam: गाणं म्हणून ‘हा’ गायक रातोरात झाला सुपरस्टार, व्हिडीओ व्हायरल
- “शिवसेना बाजीरावकी करते आहे… जनता यांचेही साम्राज्य बुडवणार”, भाजपची शिवसेनेवर टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

