औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष संजय केनेकर यांना पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात स्थानबद्ध करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा बुलढाणा तसेच औरंगाबाद दौरा आज होत आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष संजय केनेकर हे आंदोलनाच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून संजय केनेकर यांना पुंडलिक नगर पोलीस ठाणे येथे स्थानबद्ध करण्यात आल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी माहिती दिली. तसेच मुख्यमंत्र्यांचा दौरा संपन्न झाल्यावर त्यांना सोडून देण्यात येणार असल्याचेही सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्री दौऱ्यात अडथळा येणार नाही याकडे पोलीस करडी नजर ठेवून आहे.
संजय केणेकर हे भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष आहे. आगामी मनपा निवडणुकीच्या संदर्भात तसेच मागील दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या विविध कामांचा आढावा मुख्यमंत्री येणार असल्याने त्या कामांची सुरुवात झाली नसल्याचे संजय केणेकर यांचे म्हणणे आहे. त्यासाठी ते आंदोलनाचा पवित्रा घेणार होते. परंतु पोलिसांनी त्यांना स्थानबद्ध केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- अखेर शेतकरी आंदोलनावर समलमान खानने सोडले मौन, म्हणाला…
- विधान परिषदेवरील 12 जागांच्या निवडीची प्रक्रिया राज्यपाल जाणीवपूर्वक रखडवत आहेत ?
- प्रदेशाध्यक्षपदी विराजमान होत असलेल्या नाना पटोले यांना ‘या’ आव्हानांचा करावा लागू शकतो सामना
- देशात शेतकरी आंदोलनाचा भडका उडाला असताना मराठी कलाकार गप्प का ?
- ‘शेतकरी आंदोलनात माझ्यावर लावलेले आरोप बिनबुडाचे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
