औरंगाबाद : भाजपाच्या वतीने नुकतीच प्रदेश स्थरावरील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यात शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबादेत राज्य स्थरावरील तीनपदे देण्यात आली आहे. यात प्रदेश सरचिटणीस, चिटणीस व उपाध्यक्ष या पदांचा समावेश आहे.
यात आमदार अतुल मोरेश्वर सावे यांची प्रदेश सरचिटणीस, प्रविण घुगे यांची प्रदेश चिटणीस तर बस्वराज मंगरूळे यांची प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या शहरात अगोदर भाजपने डॉ. भागवत कराड यांना राज्यसभेवर घेतले. त्यापाठोपाठ त्यांना केंद्रात मंत्रीपद देखील दिले.
यानंतर आता आणखी राज्यपातळीवरील तीन पदांची जबाबदारी सावे, घुगे व मंगरुळे यांच्याकडे सोपविल्याने येत्या काळातील मनपा निवडणुकी करिता पक्षाला बळ देण्याकरीता हा निर्णय घेतला असावा अशी चर्चा राजकीय वर्तुळात एकायला मिळाली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मी गॅंगस्टर होतो तर मुख्यमंत्री कसं केलं ?,’ राणेंचा शिवसेनेला सवाल
- नाणेफेक जिंकत विराटने संपवला ‘तो’ इंग्लंडमधील दुष्काळ
- राणेंना कोर्टाचा दिलासा ; कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे हायकोर्टाकडून आदेश
- ‘पवार साहेब, आता सुसंस्कृतपणा कुठंय?’ राणेंचा संतप्त सवाल
- ‘सख्खा भाऊ योगी, शहांबद्दल असं बोलत नाही’; राणेंकडून मुख्यमंत्र्यांच्या चुकीच्या वक्तव्याचे दाखले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

