पुणे : पुण्यातील कोरोना परिस्थिती बिकट होत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी माध्यमांशी संवाद साधून माहिती दिली.
उद्यापासून (३ एप्रिल ) पुढील सात दिवसांसाठी हॉटेल, बार, मॉल, सिनेमागृह पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. हॉटेलमधून होम डिलेव्हरी सुरु राहणार आहे. तर पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पीएमपीएमएल पुढील सात दिवसांसाठी बंद असणार आहे.
यासोबतच, सर्व धार्मिक स्थळे देखील पुढील सात दिवसांसाठी बंद असणार आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे सायंकाळी सहा ते सकाळी सहा पर्यंत अत्यावशक सेवा वगळता पूर्णपणे संचारबंदी असणार आहे. हा मिनी लॉकडाऊनच असल्याची टीका करत भाजपने मात्र या निर्बंधांना विरोध केला आहे.
सायंकाळी 6 ते सकाळी 6 हा मिनी लॉकडाऊन पुणेकरांचे आर्थिक कंबरडे मोडणारा आणि अन्यायकारक असल्याची टीका भाजपचे शहराध्यक्ष व माजी आमदार जगदीश मुळीक यांनी केली आहे. तसेच, ‘पुणे शहरात आरोग्य यंत्रणा सक्षम करणे, बेड वाढवणे, ऑक्सिजन बेड वाढवणे, व्हेंटिलेटर वाढवणे, लसीकरणाचा वेग वाढवणे, चाचण्या वाढवणे आवश्यक होते. मात्र, मिनी लॉकडाऊन मुळे व्यापारी, कष्टकरी, हातावर पोट असणाऱ्या श्रमिकांचे हाल होणार आहेत.’ असं देखील मुळीक म्हणाले आहेत.
दरम्यान, ‘पुण्यातील पीएमपीएमएल ही सार्वजनिक वाहतूक सेवा बंद ठेवल्याने सर्वसामान्य नागरिकांचे, कामगारांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यांना रोजगाराला मुकावे लागणार आहे. पी एम पी बंदला भाजपचा विरोध आहे. धार्मिक स्थळे बंद करण्याचा निर्णय अन्यायकारक आहे.’ असं भाष्य जगदीश मुळीक यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- संपूर्ण औरंगाबादच कन्टेनमेंट झोन! सर्वेक्षण करणारी स्मार्ट टिमही पडली गोंधळात
- सचिन वाझेसोबत हॉटेलमध्ये येणारी ‘ती’ बाई कोण?, राणेंचा संतप्त सवाल
- ‘ “आधारवड” पवारांचा हॉस्पिटलमध्ये मुक्काम, तरीही त्यांची देशासह राज्यातील घडामोडींवर बारीक नजर’
- ममता दीदी नंदीग्राममध्ये पराभूत होणार ; अमित शहांची भविष्यवाणी
- पवार-शाह भेट महाराष्ट्राच्या हिताचीच – नारायण राणे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

