🕒 1 min read
मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटक प्रकरणात सुरु असलेल्या चौकशीत प्रत्येक दिवशी नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. तर, एटीएसने देखील सचिन वाझेंना या प्रकरणात संशयित आरोपी म्हणून घोषित केलं आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये छापेमारी करण्यात आली. या दरम्यान CCTV च्या तपासात समोर आले की, निलंबित API सचिन वाझे ज्या काळात या हॉटेलमध्ये थांबलेले होते, त्या दरम्यान एक महिला त्यांना भेटण्यासाठी आली होती. या महिलेजवळ नोटा मोजण्याचे मशीन होते.
NIA ला संशय आहे की, ही महिला वाझेंच्या जवळची कुणीतरी व्यक्ती आहे, यामुळे महिलेचा तपास सुरू केला आहे. NIA ला संशय आहे की, ही महिला या संपूर्ण कटामध्ये सहभागी असू शकते असे देखील बोलले जात आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि खासदार नारायण राणेंनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेऊन सचिन वाझेंवरही गंभीर आरोप केलेत. ‘महिन्याला १०० कोटी जमवायचे आणि अनिल देशमुखकडे नेऊन द्यायचे ही सचिन वाझेवर जबाबदारी होती, सचिन वाझे नेमका कोणासाठी काम करत होता. जनतेच्या सुरक्षेसाठी की मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना पैसे पुरवण्यासाठी काम करत होता.
एनआयएच्या चौकशीतून खरी गोष्ट लवकरच बाहेर येईल. युनूस या अतिरेक्याच्या हत्येतही वाझेचा समावेश होता. एक एपीआय सचिन वाझे ओबेरॉयमध्ये राहू शकतो. तो जिथे राहायचा त्या ओबेरॉयच्या कॅमेऱ्यामध्ये एका बाईचा फोटो आहे. ती भाईंदरला राहणारी आहे. एनआयएनं तिच्या भाईंदरच्या घरीही छापा मारला. ती बाई आणि ओबेरॉयमध्ये येणारी बाई सारखीच आहे. ती बाई वाझेसोबत कोणतं काम करत होती?’ असा संतप्त सवाल राणेंनी यावेळी विचारले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- संपूर्ण औरंगाबादच कन्टेनमेंट झोन! सर्वेक्षण करणारी स्मार्ट टिमही पडली गोंधळात
- खाजगी रुग्णालयांची अरेरावी! भाजपचे माजी शहराध्यक्ष म्हणाले, ‘वेळ आल्यावर बघून घेईल’
- राज्यात रक्ताचा तुटवडा; आव्हाडांनी रक्तदान करत केल ‘हे’ आव्हान
- पवार-शाह भेट महाराष्ट्राच्या हिताचीच – नारायण राणे
- संतापजनक : बागेतील आंबे खाल्ले म्हणून अल्पवयीन मुलांना केली बेदम मारहाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
