🕒 1 min read
सिडनी : सात जानेवारीपासून तिसरा कसोटी सामना सिडनीमध्ये होणार आहे. सिडनीला पोहचण्यापूर्वी भारतीय खेळाडू मेलबर्न येथेच सराव करत आहेत. त्याशिवाय मोकळ्या वेळेत मेलबर्न मार्टेकमध्ये किंवा हॉटेलमध्ये स्थानिक जेवणाचा आनंद घेत आहेत.
सोमवारी रोहित शर्मा, ऋषभ पंत, शुभमन गिल आणि नवदीप सैनी मेलबर्नमधील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. ऑस्ट्रेलियन मीडियानं त्यांच्यावर कोव्हिड प्रोटोकॉल मोडल्याची टीका केली. ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ या प्रकरणाची चौकशी करणार असल्याची घोषणा केली. BCCI नं मात्र हे सर्व आरोप फेटाळत खेळाडूंच्या पाठिशी राहण्याचा निर्णय घेतला होता.
भारतीय टीम आता मेलबर्नमधून सिडनीमध्ये दाखल झाली आहे. तरीही, हा वाद काही संपलेला दिसत नाही. भारताचे माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर संजय मांजरेकर यांनी त्या सर्व खेळाडूंची ट्विटरवरुन ‘शाळा’ घेतली आहे. मांजरेकर यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये कुणाचंही नाव घेतलेलं नाही, पण त्यांचा इशारा रेस्टॉरंटमध्ये जेवल्यानं वादात अडकलेल्या क्रिकेटपटूंकडेच आहे.
It’s quite simple really. Either rule yourself out for selection or once selected respect the bio bubble & the strict protocols. Can’t have it both ways.#INDvsAUSTest
— Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) January 4, 2021
मांजरेकर त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘सोपी गोष्ट आहे. तुम्ही एक तर स्वत: निवडीसाठी उपलब्ध ठेवू नका किंवा निवड झाली तर ‘बायो बबल्सच्या’ कडक नियमांचं पालन करा. तुम्ही दोन्ही गोष्टी एकत्र करु शकत नाही.’ संजय मांजेकर यांच्या या ट्वीटवर संमिश्र प्रतिक्रिया उमटली आहे.
महत्वाच्या बातम्या
- पीसीएमसी ते फुगेवाडी या सहा किलोमीटर मार्गावर मेट्रोची चाचणी पूर्ण
- काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी कोरोना लसीला मान्यता देण्याच्या प्रक्रियेवर केले ‘हे’ प्रश्न उपस्थित
- …तर महाराष्ट्राचेही नामांतर करा; महाविकास आघाडीतील घटक पक्षाची राज्य सरकारकडे मागणी
- फुले वाड्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार कटिबद्ध – धनंजय मुंडे
- हॉट मलायकाने केला बिकिनीमध्ये योगा; फोटोवर चाहते फिदा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
