🕒 1 min read
नवी दिल्ली: स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून देशातील विविध प्रशासकीय सेवेत रुजू होण्याचे स्वप्न अनेक तरुण तरुणी पाहत असतात. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचा प्रवास आणि यश अगदी खडतर असते. त्यामुळे या यशोगाथा समाजातील इतर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरतात. अशा अनेक गरीब घराण्यातील मुलेही आयएएस अधिकारी झाल्याची कित्येक उदाहरणे आपण पाहिली आहेत.
त्यांनतर आता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कन्या अंजली बिर्ला यांनीही कष्ट आणि चिकाटीतून आयएसएस पदी नियुक्ती झाली आहे. वडिल देशाच्या लोकसभेचे सभापती असतानाही लेकीनं वडिलांचं नाव अभिमानाने आणि गौरवाने मोठं केलंय. तर अनेकदा मोठ्या हुद्यावर असलेल्या पालकांच्या पाल्य म्हणावीशी कारकीर्द घडवत नसल्याच्या अनेक उदाहरणे आपण पाहतो’ मात्र अंजली बिर्ला याला अपवाद ठरली आहे.
त्यामुळेच, ओम बिर्ला यांच्या घरी सध्या उत्सवाचे वातावरण आहे. कारण, लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अंजली ओम बिर्ला यांनी यश मिळवले असून सोमवारी या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला होता. युपीएससी परीक्षांच्या निकालात अंजली यांचे नाव झळकताच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सभापती ओम बिर्ला आणि त्यांची कन्या अंजली बिर्ला यांचं अभिनंदन केलं आहे.
Anjali Birla – Speaker Hon. @ombirlakota Ji’s daughter has qualified the Civil Services – I.A.S. Examination. Heartiest Congratulations.
Extremely Proud of our daughters ???? pic.twitter.com/2qVLk0anrE
— Supriya Sule (@supriya_sule) January 4, 2021
कोटा येथील सोफिया महाविद्यालयात आर्ट शाखेतून अंजली यांनी आपले शिक्षण घेतले. त्यानंतर, दिल्लीतील रामजस महाविद्यालयातून राज्यशास्त्र विषयात ऑनर्स पदवी घेतली. त्यानंतर, दिल्लीतच त्यांनी स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात केली होती. विशेष म्हणजे पहिल्याच प्रयत्नात त्यांनी हे यश मिळवले असून मोठी बहिणी आकांक्षा यांचं मोलाचं मार्गदर्शन आणि सहकार्य लाभल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच, आई डॉ. अमित बिर्ला आणि वडिल ओम बिर्ला यांनीही स्वत:वर विश्वास ठेवून तयारी करण्यास बळ दिल्याचेही अंजली यांनी म्हटलंय.
महत्वाच्या बातम्या
- हॉट मलायकाने केला बिकिनीमध्ये योगा; फोटोवर चाहते फिदा
- काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी कोरोना लसीला मान्यता देण्याच्या प्रक्रियेवर केले ‘हे’ प्रश्न उपस्थित
- नामांतर : तेव्हा तुमचे मुख्यमंत्री काय झोपा काढत होते का ? देसाई भाजपवर कडाडले
- खडसेंबाबतची माहिती घेण्यासाठी ‘ईडी’चे अधिकारी पुण्यात दाखल
- आशा भोसले यांचं इंस्टग्राम अकाऊंट हॅक; महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलनं केलं अलर्ट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
