Share

राष्ट्रवादीचा भाजपला जबर धक्का; नवी मुंबईतील मातब्बर नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश

Published On: 

🕒 1 min read

नवी मुंबई:- गेल्या वर्षभरात भाजपला एकामागोमाग एक धक्के बसत आहेत. २०१४ नंतर भाजपमध्ये झालेली मेगाभरती थांबली आहे. तर, भाजपमधून गळती सुरु झाल्याचं दिसून येत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हाती घेतल्यानंतर त्यांच्या अनेक समर्थक नेत्यांनी देखील भाजपला रामराम ठोकला आहे.

यानंतरही, भाजपला छोटे-मोठे धक्के सहन करावे लागले. महाविकास आघाडीतील एकीममुळे भाजपला पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुकांमध्ये देखील जिव्हारी लागणार पराभव स्वीकारावा लागला होता. आता, राष्ट्रवादीने भाजपला आणखी एक तडाखा दिला आहे.

भाजपचे नेते गणेश नाईक याचे निकटवर्तीय भाजपच्या माजी नगरसेविका दिव्या गायकवाड आणि माजी नगरसेवक वैभव गायकवाड यांनी काही वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्ष प्रवेश केला.

आमदार गणेश नाईक यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे दिघ्यातील नवीन गवते, अपर्णा गवते आणि दीपा गवते या तीन माजी नगरसेवकांनी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात भाजपला रामराम केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी गवतेंनी शिवबंधन बांधले. पालिका निवडणुकीला काही महिने शिल्लक राहिले असतानाच गवतेंच्या शिवसेना प्रवेशामुळे शिवसेनेने नाईकांना मोठा धक्का दिला. त्यानंतर आता पुन्हा एकदा नाईकांना धक्का बसला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!