औरंगाबाद: राज्यातील तिघाडी सरकारच्या गैरकारभारामुळे मराठा आरक्षण तसेच ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले. याच्याच निषेधार्थ शनिवारी दि. २६ जून रोजी जिल्हाभरात चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे. शहरात आकाशवाणी येथे सकाळी दहा वाजता हे आंदोलन करणार असल्याची माहिती आमदार अतुल सावे यांनी बुधवारी दि. २३ जून रोजी झालेल्या एका पत्रकार परिषदेत दिली.
आमदार सावे म्हणाले की, ओबीसी आरक्षणाला न्यायालयात आव्हान दिल्यानंतर फडणवीस सरकारच्या काळात एम्पिरिकल डाटा दाखल करण्यासाठी दोन महिन्याची मुदत मागितली होती. मात्र दुर्दैवाने राज्यात सरकार बदलले आणि महाविकास आघाडी सरकार आले. या सरकार मधील मंत्र्यांनी दोन महिन्यात हा एम्पिरिकल डाटा करण्याची घोषणा केली. मात्र पंधरा महिने झाले तरीही अद्याप हा डाटा न्यायालयात दाखल केल नाही. यामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले.
ओबीसी आणि मराठा सामाजाच्या आरक्षणाबाबत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविणे अपेक्षित होते. मात्र तिघाडी सरकार केवळ दोन दिवसांचेच पावसाळी अधिवेशन घेत आहे. या प्रकरणी वेळीच पावले उचलले नाहीत, तर ओबीसींचे शैक्षणिक व नोकऱ्यांमधील आरक्षणही धोक्यात येईल असेही आमदार सावे यांनी सांगितले. यावेळी आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केणेकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल मकरिये व इतर मान्यवर उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- पवारांच्या दिल्लीतील खलबतांनंतर आता राऊतांनी घेतली भेट ! ट्विटवरून दिली ‘ही’ माहिती
- नातेवाईकाच्या लग्नासाठी आला अन् जलाशयात पोहण्याच्या मोहापायी बुडाला!
- मराठवाड्याची पाणी टंचाई दूर करण्यासाठी फडणवीस सरकारच्या प्रकल्पाबाबत मोठा निर्णय !
- इंडिगोची औरंगाबाद ते दिल्ली, हैदराबाद विमान सेवा ५ जुलैपासून
- राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९५.९३ टक्के ! जाणून घ्या आजची रुग्णसंख्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
