Share

भाजपकडून विधानपरिषदेचे उमेदवार जाहीर, पंकजा मुंडेंना पुन्हा डावललं!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्राच्या आगामी विधानपरिषद निवडणुकांसाठी भाजपकडून पाच नावांची घोषणा झाली आहे. यामध्ये विधानपरिषद विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री राम शिंदे, भाजप महाराष्ट्र राज्य सरचिटणीस संघटक श्रीकांत भारतीय, भाजप महिला मोर्चा अध्यक्षा उमा खापरे आणि भाजप नेते प्रसाद लाड या पाच नावांची घोषणा भाजपकडून करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत या सर्वांचे उमेदवारी अर्ज आता दाखल करण्यात येणार आहेत. यात विशेष बाब म्हणजे भाजप नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांना यावेळेस ही डावलण्यात आले आहे.

पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळालेली माही. याबाबात राज्याच्या राजकारणात चर्चा सुरू आहे. राजकीय तर्क वितर्कांना उधाण आले आहे. अश्यातच यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं आहे. “आम्ही कोरी पाटी असतो. पक्ष जो निर्णय घेतो, तो आम्हा सर्वांना मान्य असतो. कोणाला उमेदवारी मिळाली नाही याचा अर्थ फुलस्टॉप नसतो. तर तो कॉमा असतो. कॉमानंतरही काही वाक्य लिहता येतात,” असे सूचकपणे चंद्र्कांत पाटील म्हणाले.

पंकजा मुंडे यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजीचे पडसाद उमटू शकतात. उमा खापरे, श्रीकांत भारतीय यांच्यापेक्षाही पंकजा मुंडे वरिष्ठ आणि अनुभवी असूनही त्यांना उमेदवारी मिळाली नाही, याबद्दल सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आता पंकजा मुंडे यांची नाराजी उफाळून येते का ? मुंडेंच्या समर्थक आता काय आपल्या भावना व्यक्त करतात, हे पाहणं महत्त्वाचे आहे. भाजप या परिस्थितीला कसे हाताळते, हे ही महत्त्वाचे आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!