हिंगोली : शहरातील महात्मा गांधी चौकात भाजपच्या वतीने आज ओबीसी समाजाचे हक्काचे आरक्षण परत मिळवून देण्यासाठी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. तसेच या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, काही दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसी समाजाला असलेले राजकीय आरक्षण, यासंदर्भातील आपल्या सरकारची पुनर्विचार याचिका फेटाळली आपणास देखील या गोष्टींची माहिती आहेच. परंतु आपण त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाहीत. परत प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्या हातात ठोस काही असणे आवश्यक असते आपल्याकडे ते नाही म्हणूनच आपण प्रतिक्रिया देणे टाळले आहे.
दोन डिसेंबर २०१९ या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने आपल्या राज्य सरकारला ओबीसी आरक्षणा संदर्भाने काहीं आदेश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला बजावून सांगितले होते की लवकरात लवकर राज्य मागासवर्गीय आयोगाचे न करावे. राज्यातील ओबीसी समाजाचा ईमेल जमा करुन तो तत्काळ न्यायालयास सादर करावा न्यायालयाच्या या आदेशाला जवळपास पंधरा महिने झाले मात्र आजूनही आपण साधे राज्य मागासवर्गीय आयोगाचे गठन देखील केलेले नाही.
ही अंत्यत गंभीर बाब आहे दोन डिसेंबरला नंतर देखील आपल्या सरकारला माननीय सर्वोच्च न्यायालयाने जवळपास दहा ते बारा तारखा दिल्या एकही तारखेला आपले सरकार न्यायालयाने दिलेल्या आदेशांची पूर्तता करुन न्यायालयात हजर राहिले नाही. आणि तुम्ही देखील या प्रकरणात स्वतः जातीने लक्ष घातले नाही भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चा आपल्याला चेतावणी देत आहे.
लवकरात लवकर यावर ठोस कारवाई करा तसे झाले नाही तर आमच्याकडे आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. लाखांच्या संख्येने ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल. ओबीसी समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळणार नाही. तोवर आम्ही शांत बसणार नाही असे निवेदनात नमूद केले आहे. आंदोलनप्रसंगी आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी आमदार रामराव वडकुते, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, भाजप ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाईक, नारायण खेडेकर आदी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- ‘२०१४ के बाद साल बदले, युवाओं के हाल बदले.. पहले रोजगार था, अब सिर्फ़ इंतज़ार रह गया’
- कोरोनामुळे आई-बहिणीला गमावल्यानंतर वेदा कृष्णमुर्तीने पहिल्यांदाच व्यक्त केली भावना, म्हणाली..
- पावसाळ्याच्या तोंडावरच औरंगाबादेत विजेचा लपंडाव सुरू, महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
- शतक कॉनवेचे; चर्चा मात्र दादाची! जाणून घ्या काय आहे कारण..
- ‘विधानसभेतील पराभव अल्पविराम आहे, पुर्णविराम नाही’, धनंजय मुंडेंकडून पराभूत झालेल्या प्रकारावर पंकजा मुंडेंचे भाष्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

