नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारला नुकतीच ७ वर्षे पूर्ण आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि सत्ताधारी भाजप आपली कामगिरी मांडत आहे. तर विरोधी पक्ष काँग्रेसने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. मोदी सरकार देशासाठी हानिकारक आहे, असं अशी टीका काँग्रेसने केली आहे. मोदी सरकारने गेल्या ७ वर्षात फक्त अनेक घाव दिले आहेत. जे कधीच भरून निघणारे नाहीत. ७ वर्षांतील बेसुमार बेरोजगारी, महागाई आणि अर्थव्यवस्था डबघाईला गेली आहे. यामुळे मोदी सरकार देशासाठी हानिकारक आहे असा आरोप काँग्रेसकडून होतोय.
शिवाय काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरूनही मोदी सरकावर शायरीच्या स्वरुपात निशाणा साधण्यात आलाय. ‘भूल जाओ दो करोड़ रोजगार, जो है, वही छोड़ दो सरकार… 2014 के बाद साल बदले, युवाओं के हाल बदले…पहले रोजगार था, अब सिर्फ़ इंतज़ार रह गया. अबकी बार करोड़ों बेरोजगार’ असे म्हणत भाजप सरकारवर टीका करण्यात आलीये. सोबतच एक व्हिडिओही शेअर करण्यात आलाय.
भूल जाओ दो करोड़ रोजगार,
जो है, वही छोड़ दो सरकार2014 के बाद साल बदले, युवाओं के हाल बदले…पहले रोजगार था, अब सिर्फ़ इंतज़ार रह गया।#अबकी_बार_करोड़ों_बेरोजगार pic.twitter.com/tRb6wRJa63
— Congress (@INCIndia) June 3, 2021
गेल्या ७ वर्षांत आपण लोकशाहीचा सन्मान, घटनात्मक संस्था, सरकारच्या मर्यादा, पंतप्रधानांच्या संवेदना, वेदना आणि वचन पूर्ण करण्याच्या विश्वास गमवला आहे. आपण माणुसकी, स्वावलंबन, जागतिक मूल्ये गमावली आहेत. पंतप्रधानांनी जनतेचा विश्वास आणि आदर गमावला आहे. परंतु आजही ते स्वतःला महान समजतात, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- सिल्लोड आठवडी बाजारातील विक्रेत्यांवर उपासमाची वेळ, दुकाने सुरु करण्याची मागणी
- कोरोनामुळे आई-बहिणीला गमावल्यानंतर वेदा कृष्णमुर्तीने पहिल्यांदाच व्यक्त केली भावना, म्हणाली..
- पावसाळ्याच्या तोंडावरच औरंगाबादेत विजेचा लपंडाव सुरू, महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
- शतक कॉनवेचे; चर्चा मात्र दादाची! जाणून घ्या काय आहे कारण..
- ‘विधानसभेतील पराभव अल्पविराम आहे, पुर्णविराम नाही’, धनंजय मुंडेंकडून पराभूत झालेल्या प्रकारावर पंकजा मुंडेंचे भाष्य


