मुंबई: IPL 2022 मध्ये सीजनचा चौथा सामना खेळला जात आहे. या सामन्यात, प्रथमच लीगशी संबंधित दोन्ही संघ, लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स आमनेसामने आहेत. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकत हार्दिक पंड्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात सुरुवातीला लखनऊची फलंदाजी ढासळताना दिसली. मात्र दीपक हुड्डाने येऊन धमाका केला आहे.
सलामीवीर के एल (KL Rahul) आणि क्विंटन (Quinton De Kock) अवघ्या काही मिनिटात माघारी परतल्यावर लखनऊचा संघ संकटात सापडला होता. मात्र दीपक हुड्डाने (deepak hooda) येऊन संघाला तारले आहे. त्याने धमाकेदार अर्धशतक झळकवले. ज्यात मोठं मोठ्या फटकारांचाही समावेश होता. दीपकची फलंदाजी बघून चाहते आनंदित दिसले तर लखनऊचा डग आऊटही त्याच्या प्रत्येक चेंडूवर टाळ्या वाजवत होता. यात विशेष म्हणजे हुड्डाचा ‘जानी दुश्मन’ कृणाल पंड्याही (krunal pandya) त्याची खेळी बघून टाळ्या वाजवत होता.
दीपक हुड्डा धमाकेदार ५५ धावांची खेळी करून माघारी परतला आहे. त्याने ४१ चेंडूत ही कामगिरी केली, ज्यात ६ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. तो पॅव्हेलियन मध्ये परतताना कृणाल मैदानात शिरला आणि यावेळी कृणाल दीपकचे चांगल्या खेळीसाठी फिस्ट बम्प करत अभिनंदनही करताना दिसला. यामुळे हे दोन पक्के वैरी एका संघात कसे खेळणार या प्रश्नाचे उत्तर सगळ्यांना मिळाले आहे.
महत्वाच्या बातम्या
- IPL 2022 : ‘जानी दुश्मन’ कृणाल-दीपक झाले लखनऊच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग; नेटकऱ्यांचे मजेदार मीम्स व्हायरल!
- IPL 2022 : शुबमन गिलनं घेतलेला ‘हा’ कॅच पाहिलात, तर तुम्हाला कपिल देव यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही!
- VIDEO : मॅच सुरू होऊन दोन मिनिटं झाली अन्..! पाहा शमीच्या पहिल्याच चेंडूवर कसा आऊट झाला केएल राहुल!
- आमदारांना मोफत घरं देण्याला शरद पवारांचा विरोध!
- “आमचा एकच बसला तर आईचं दूध आठवेल” – तानाजी सावंतांचा राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा


