मुंबई: IPL 2022 च्या चौथ्या सामन्यात, दोन्ही पदार्पण करणारे लखनऊ सुपरजायंट्स आणि गुजरात टायटन्स मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर एकमेकांसमोर आहेत. नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजी स्वीकारताना सुपर जायंट्सने खराब सुरुवातीनंतर १५८ धावांची मजल मारली. दीपक हुडा आणि आयुष बदोनी यांनी यामध्ये सर्वाधिक योगदान दिले आहे. कठीण परिस्थितीत संघाला सांभाळताना या दोन्ही फलंदाजांनी गुजरातच्या गोलंदाजांना पळवून सोडले. यानंतर मात्र गौतम गंभीरचे कौतुक केले जात आहे.
गौतम गंभीरचे (gautam gambhir) नावाची चर्चा होण्यामागील मुख्य कारण म्हणजे तरुण खेळाडू आयुष बदोनी (Ayush badoni) आहे. आयपीएलमध्ये पर्दापण सामना खेळणाऱ्या आयुषने लखनऊची ढासळती खेळी सांभाळत ५४ धावांची अर्धशतकीय खेळी केली आहे. तो आयपीएलमध्ये पर्दापण सामन्यात अर्धशतक करणारा २०वा खेळाडू ठरला आहे. आयुष बदोनीला संघात आण्याचे श्रेय कोच गंभीरला जाते.
आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये त्याला लखनऊ सुपरजायंट्सच्या संघाने २० लाख रुपयांना विकत घेतले होते. संघाचे स्काऊटिंग हेड विजय दहिया यांनी एकच मुश्ताक अली ट्रॉफीचा सामना खेळलेल्या तरुण आयुष बदोनीवर खूप आत्मविश्वास दाखवला, त्यामुळे लखनऊ संघाने त्याला आपल्या शिबिरात सामील करण्याचा निर्णय घेतला. आणि मेंटॉर गौतम गंभीरने स्काऊटिंग हेड निर्णयावर विश्वास व्यक्त करत त्याला पदार्पणाची संधी दिली आणि आयुषने त्या संधीचे सोने केले.
महत्वाच्या बातम्या
- IPL 2022 GT vs LSG : हुडा, बदोनीमुळं लखनऊ सावरलं; गुजरातला मिळालं १५९ धावांचं आव्हान!
- IPL 2022 : …अन् दीपक हुड्डाची धमाकेदार खेळी बघून कृणाल पंड्याही झाला खूश; वाजवल्या टाळ्या!
- IPL 2022 : ‘जानी दुश्मन’ कृणाल-दीपक झाले लखनऊच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग; नेटकऱ्यांचे मजेदार मीम्स व्हायरल!
- IPL 2022 : शुबमन गिलनं घेतलेला ‘हा’ कॅच पाहिलात, तर तुम्हाला कपिल देव यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही!
- VIDEO : मॅच सुरू होऊन दोन मिनिटं झाली अन्..! पाहा शमीच्या पहिल्याच चेंडूवर कसा आऊट झाला केएल राहुल!


