नवी-दिल्ली : पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्याेत सिंग सिद्धू यांचे सल्लागार मालविंदर सिंग माली हे काही दिवसांपूर्वी काश्मीरसंदर्भातील एका वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा ते आपल्या एका पोस्टमुळे चर्चेत आले आहेत.
मालविंदर सिंग यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये इंदिरा गांधी मानवी कवट्यांच्या ढिगावर हातात बंदूक घेऊन उभ्या आहेत तर त्यांच्या बंदुकीच्या टोकावर एक कवटी अडकवलेली दिसत आहे. हे चित्र पंजाबमधल्या जनतक पैगाम या मासिकाच्या जून १९८९ च्या अंकाचे मुखपृष्ठ होते. त्याकाळी या मासिकाचे संपादक मालविंदर सिंग माली होते.

तसेच या फोटोवर त्यांनी कॅप्शन दिले आहे की,’प्रत्येक दडपशाहीचा पराभव होतो.’ शीखविरोधी दंगलींच्या संदर्भात १९८४ साली हे चित्र छापण्यात आले होते. त्यानंतर मालविंदर सिंग यांनी पुन्हा एकदा हे चित्र पुन्हा समोर आणल्याने खळबळ उडाली आहे.
दरम्यान, यापूर्वी ‘काश्मीर हा एक वेगळा देश आहे, भारत आणि पाकिस्तानने बेकायदेशीरपणे व्यापलेला आहे. काश्मीर काश्मीरच्या लोकांचा आहे.’ असा दावा माली यांनी फेसबुक पोस्ट करत केला होता. त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकास्त्रांचे वार करण्यात आले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- तालिबानवर विश्वासासंबंधी बायडेन यांचे खोचक वक्तव्य, म्हणाले..
- भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी ; हि गर्दी टाळली पाहिजे- आरोग्यमंत्री
- गुन्हे मागे ; बैलगाडा मालकांनी जल्लोषात केला गृहमंत्री वळसे पाटलांचा सत्कार
- मोठी बातमी : मंत्रालयाबाहेर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी सुभाष जाधव यांचा मृत्यू
- शहरात लसीकरणाला प्रतिसाद ; पावणे सात लाख जणांचे लसीकरण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

