Share

‘केंद्राने पाऊल उचलले चला राज्य सरकारला सांगा २५ रूपये कमी करायला’ भाजपचे राऊतांना आवाहन

Published On: 

मुंबई: दिवाळीच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. केंद्र सरकारने बुधवारी पेट्रोल 5 आणि डिझेलच्या दरात 10 रुपयांची उत्पादन शुल्कात कपात केली आहे. मात्र यावरूनच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फक्त ५ रुपयांनी पेट्रोल दर कमी करून काय होणार? असा सवाल करत किमान २५ रुपयांनी तरी दर कमी करायला हवे होते अशी मागणी केली आहे. आता यावरूनच भाजप नेते केशव उपाध्ये यांनी राऊत यांना आव्हान दिले आहे.

केंद्राने पाऊल उचलले चला आता राज्य सरकारला सांगा २५ रूपये कमी करायला,असे आव्हान केशव उपाध्ये यांनी केले आहे. दरम्यान देशभरात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला, तर पेट्रोलचे दर ५ रुपयांनी कमी झाले. असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

तसेच जर भाजपचा पूर्ण पराभव झाला, तर पेट्रोल ५० रुपयांनी स्वस्त होईल असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे. लोक पेट्रोल पंपावर १५ ते २० रुपयांचे पेट्रोल भरतात आणि समोर लागलेल्या मोदींच्या फोटोतून म्हटले जाते, आम्हाला मतदान दिल्याची किंमत चुकवा. असा टोलाही त्यांनी लगावला आहे. तसेच राज्यात पेट्रोल दरकपातीवर चर्चा सुरु असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पेट्रोल-डीजेल भाववाढ करून केंद्राने १२७ लाख कोटी रुपये कमावले असल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे. मात्र हे दिवस २०२४ साली जातील असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!