मुंबई : कोरोना रुग्णाच्या मृतदेहाची अदलाबदल झाल्याचा धक्कादायक प्रकार लातूर मध्ये घडला होता. या घटनेवर भाजप महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा उमा खापरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हा अत्यंत विचित्र प्रकार सुरू असल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलीय.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृतदेहाची हेळसांड करण्याचा प्रकार लातूर जिल्ह्यामध्ये घडला होता. यामध्ये अंत्यसंस्कार झाल्यानंतर मृतदेह जमिनीतून उकरुन काढण्यात आला होता. तो मृतदेह पुन्हा खऱ्या नातेवाईकांच्या स्वाधिन करण्यात आला होता. त्यामुळे राज्यभर या घटनेचे पडसाद उमटले असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
https://twitter.com/KhapreU/status/1390590725444628485
या संबंधी उमा खापरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलीय. त्यांनी म्हटले की, ‘लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयातील दुर्दैवी घटना… मृतदेहांची अदलाबदल, त्यामुळे शेळगावमध्ये अंत्यविधी केलेला मृतदेह जमिनीतून उकरुन त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आलाय… मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काय विचित्र प्रकार सुरु आहे?’
महत्त्वाच्या बातम्या
- आयपीएल स्थगितीनंतर सकारिया गेला रुग्णालयात ; घेतली कोरोनाग्रस्त बापाची भेट, म्हणाला…
- ‘मोदीसाहेब, बंगालच्या पराभवाचा राग पेट्रोल डिझेलवर का काढताय?’, रुपाली चाकणकरांचा टोला
- औरंगाबादेत हेल्मेट सक्ती प्रकरण, हायकोर्टाकडून पोलिसांची खरडपट्टी
- निवडणूक संपल्याचा परिणाम; सलग तिसऱ्या दिवशी इंधन दरवाढ
- ‘कोरोना लसीकरणाची गती कमी होऊ देऊ नका’, पंतप्रधान मोदींचे राज्यांना आवाहन


