🕒 1 min read
मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊतांनी मोठा दावा केला आहे. महाराष्ट्रात पुढील २५-३० वर्ष तरी भाजपाची सत्ता येणार नाही.(BJP will not have CM in state Sanjay Raut claim) त्यामुळे काही झालं तरी महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही असे आव्हानही त्यांनी भाजपला केले आहे.
जे फ्रस्टेशनमध्ये असतात, निराश मनाने राजकारण करतात त्यांच्या नशिबी शेवटपर्यंत निराशाच असते. त्यांचा जागतिक स्तरावरचा पक्ष आहे. उद्या ब्रिटनचा पंतप्रधान त्यांचा माणूस होईल, व्हाईट हाऊसमध्ये त्यांचा पंतप्रधान असेल असं ते सांगू शकतात. पण काही झालं तरी राज्यात त्यांचा मुख्यमंत्री होणार नाही असे संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी म्हटले आहे.
तसेच स्थानिक राजकारणाच्या नावाखाली काही भ्रष्ट हातमिळवणी होत असते. आमची भाजपासोबत युती असतानाही आमच्या काही लोकांनी केल्या होत्या. मात्र आता अशी मनमानी चालणार नाही. उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. असे म्हणत पुष्पातील ‘झुकेंगे नही’ हा डायलॉग शिवसेनेच्या बाण्यावरून घेतला असावा. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. कारण ‘झुकेंगे नही’ हा आमचा गेल्या ५५ वर्षापासूनचा नारा आहे. संजय राऊतांचा तर तो नाराच आहे. कशाला झुकायचं? का झुकायचं? आमचे काही उमेदवार बाद झाले असले तरी आम्ही लढू असेही राऊत यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “…मग आशिष शेलार आणि अतुल भातखळकरांना गुजरात पेंग्विन म्हणायचे का?”, किशोरी पेडणेकरांचा सवाल
- “…तुमच्या शापाने कावळाही मरणार नाही”, राऊतांच्या टीकेवर भातखळकरांचे प्रत्युत्तर
- गांधींबाबत अपशब्द वापरणाऱ्या कालीचरण यांना ‘गोडसे-आपटे भारतरत्न’ पुरस्कार; हिंदू महासभेनं केलं सन्मानित!
- “केवळ महसुलासाठी मद्य विक्रीला प्राधान्य देणे हे जनतेचं दुर्दैव”, अण्णांनी साधला ‘मविआ’वर निशाणा
- औरंगाबादेतील ‘बायको पाहिजे’ बॅनर प्रकरणाची महिला आयोगाकडून दखल; रुपाली चाकणकर म्हणाल्या..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
