Share

Sharad Pawar | वेदांत प्रकल्पावरून शरद पवारांचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्ला, म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

पुणे : वेदांत ग्रुप व फोक्सकॉनचा सेमीकंडक्टर चिप निर्मितीचा प्रकल्प गुजरातला गेला आहे. त्यामुळे दीड लाख तरूणांचा रोजगार गेला आहे. या सगळ्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात याचे पडसाद उमटलेले पाहण्यास मिळाले. हा प्रकल्प राज्यातून जाण्यासाठी सध्याच सरकार जबाबदार असल्याचं विरोधी पक्षनेते म्हणत आहेत. तर सत्ताधरी विरोधकांवर आरोप करत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या प्रकरणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले शरद पवार ?

मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री या दोघांचं वक्तव्य असं होतं की मागच्या सरकारच्या काळात या प्रकल्पासंदर्भात काही निर्णय घेतला नाही. या सगळ्यासाठी उद्धव ठाकरे सरकार जबाबदार आहे. उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये उदय सामंत मंत्री होते आणि एकनाथ शिंदे मंत्री होते. हे दोघे ज्या मंत्रिमंडळात होते, त्या मंत्रीमंडळाने दुर्लक्ष केल्याचे आरोप त्यांनी केले. परंतू मला वाटतं हे शहाणपणाचं लक्षण नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

काल पुण्यामध्ये पत्रकार परिषदत आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी शरद पवार यांना महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेलेल्या प्रकल्पासंदर्भात विचारण्यात आलं असता तेव्हा ते बोलत होते. पुढे ते असंही म्हणाले की, प्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीची चर्चा झाली. ते मदत करतील असं सांगितलं जात आहे. तसं झालं तर आनंदच आहे. मात्र अशातच आणखीन एक प्रकल्प महाराष्ट्राला देऊ असं म्हटलं जात आहे. हे म्हणजे एका घरात एका लहान मुलाला एक फुगा दिला, दुसऱ्या मुलाच्या हट्टानंतर त्याला त्याहून मोठा फुगा देऊ असं सांगण्यासारखं आहे.

दरम्यान, वेदांता-फॉक्सकॉनचा संलग्न प्रकल्प महाराष्ट्र उभारणार,असं वेदांता प्रकल्पाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी सांगितलं आहे. यावरून दुसऱ्या प्रकल्पाचं राज्यातील जनतेला गाजर नका दाखवू, असं म्हणत विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज्य सरकारला फटकारलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!