Share

Ajit Pawar । आता बाळासाहेब असते तर बिन पाण्याने केली असती; अजित पवारांची शिंदे गटावर आक्रमक टीका

Published On: 

Ajit Pawar। मुंबई : गेल्या काही दिवसांपासून दसरा मेळाव्यावरून राज्याचं राजकीय वातावरण तापलं आहे. दसरा मेळाव्यात शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट दोन्ही गट आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहेत. यावेळी दोन शिवसेना गट तयार झाल्याने दसरा मेळावा कोण घेणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दोन्ही गट मूळ शिवसेनेचेच असल्याचा दावा करत आहेत. तर शिवसैनिक आजही आपल्या पाठिशी आहेत, असा संदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दसरा मेळाव्यातून द्यायचा आहे. यावरून आता विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आज शिंदे गटातील आमदारांचा चांगलाच समाचार घेतलाय.

काय म्हणाले अजित पवार ?

दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी पक्षाची जवाबदारी आपल्या मुलाला दिली होती. त्यासाठी त्यांनी आपल्या पुतण्या देखील बाजूला केले. आता बाळासाहेब असते तर बिन पाण्याने केली असती असं म्हणत दसरा मेळाव्याचा घाट घालण्याच्या प्रयत्नात असेलल्या शिंदे गटावर दादांनी टीका केली आहे. शिंदे गटातील आमदारांना सत्तेची मस्ती, नशा चढली आहे. ‘चून चून के मारायला काय घरातल्या मुंग्या आहेत का?’ असा सवाल उपस्थित करत अजित पवारांनी शिंदे गटाच्या संजय गायकवाडांवर निशाणा साधला आहे.

यांचेच आमदार गोळ्या उडवतात. यांना सत्तेची मस्ती, धुंदी आणि नशा आली आहे. आमदार आपल्या कार्यकर्त्यांना हात पाय तोडण्याची शिकवण देत आहेत. काय बापाची ठेव आहे काय? बुलढण्याचे आमदार म्हणतात शिंदे विराधात बोललात तर चुन चुन कें मारेंगे. मारायला काय घरातल्या मुंग्या आहेत का? असा टोला देखील त्यांनी लगावला आहे. पुढे यावेळी त्यांनी अजित पवारांना देखील टोला लगावला.

अजित पवार यांचे एकनाथ शिंदेंना टोमणे –

मुख्यमंत्र्यांच्या सकाळी ६ वाजता झोपण्याच्या वक्तव्यावरुन अजित पावर यांनी चांगलेच टोमणे लगावले. “एकनाथ शिंदे म्हणाले मी सकाळी ६ वाजेपर्यंत काम करतो, मग हे उठतात कधी? २४ तास माणूस एक-दोन दिवस काम करु शकेल. किंवा सुरतला गेल्यावर आता पद मिळणार म्हणून जागू शकेल. पण कधीतरी मेंदू म्हणेल, अरे झाेप…झोप. सहा तास तरी झोप पाहीजे. आम्ही ५५ वर्ष शरद पवारांच काम पाहील आहे. ते रात्री दोन वाजता जरी झोपले तरी सकाळी ७ ला तयार असायेच. पण ते देखील ५ ते ६ तास झोप घ्यायचे. पटेल असं बोलावं राव लय पुढचं बोलायला लागलाय. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात, आम्हाला आदार आहे. पण तुम्ही न पटण्यासारखे बोलायला लागल्यावर आम्हालाही बोलायला लागणार”, असे अजित पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!