🕒 1 min read
बुलडाणा : शेतकऱ्यांचे सन २०२० मधील खरीप हंगामातील पिक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत मिळालेले नाही. पिक विमा कंपन्या शेतकऱ्यांना जाचक अटी घालून लाभ देण्यापासून पळ काढत आहे. राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून महाविकास आघाडी उत्तर प्रदेश च्या प्रश्नावर महाराष्ट्र बंद ठेवत आहे तर महाराष्ट्राच्या प्रश्नावर मूग गिळून गप्प आहे. या नाटकी महाविकास आघाडी सरकारचा भाजपा जाहीर निषेध व्यक्त करून राज्य सरकारला जागे करण्यासाठी भाजपने आसूड उगारला आहे, २७ ऑक्टोबर रोजी हा आसूड जिल्ह्याचे ठिकाणी उगारण्यात येणार आहे.
महापुराने सुपीक जमिनी खरडून नापीक झाल्या आहेत. खरिप हंगामातील सर्वच पिके ७० टक्के वाया गेली. सोयाबीनच्या सुड्या वाहून गेल्या तर काही गुडघ्या इतक्या पाण्यात बुडाल्या आहेत.कापसाला येत असलेली बोंडे काळवंडून खराब होत आहे.यंदा जिल्ह्यात ६६ हजार हेक्टर वर सोयाबीन तर १.९४ लाख हेक्टर वर कपाशीच्या पेरा झाला या सोबतच मका, तूर, भाजीपाला,फळपिके यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वारंवार मागणी करूनही जिल्ह्यात अद्यापपर्यंत ओला दुष्काळ शासनाने जाहीर केलेला नाही.
राज्य सरकार शेतकऱ्यांना मदतीचे जे पॅकेज जाहीर केले आहे ते अतिशय तोकडे असून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारे आहे. त्यामुळे दिवाळी सारख्या सणाच्या तोंडावर पंचनामे न करता आता शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ सरसकट हेक्टरी ५००००रुपयांची मदत जमा करा, पिक विम्याच्या रकमा तात्काळ जमा करून पीक विम्याच्या लाभापासून शेतकऱ्यांना वंचित ठेवणाऱ्या पिक विमा कंपन्या वर कारवाई करा, शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसातून किमान १० तास वीज पुरवठा करा आदी मागण्यांसाठी जिजामाता स्टेडियमपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर होऊ घातलेल्या आसूड मोर्चात सर्व शेतकरी बांधव व भाजप आजी-माजी पदाधिकारी यांनी सामील व्हावे, असे आवाहन प्रदेश प्रतिनिधी माजी आमदार विजयराज शिंदे यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘त्यांना आहे तिथेच ठेवा, इथे आले तर…’, फडणवीसांचे टीकास्त्र
- जगाला सध्या धार्मिक, आर्थिक व राजकीय दहशतवादापासून धोका-रामदेव बाबा
- ‘देख लो यारो, गधे घोडे दौडा रहे है…’; भातखळकरांचा मलिकांना टोला
- ईडी म्हणजे पानतंबाखुचे दुकान, माझ्या घरीही धाड पडू शकते-आ. प्रणिती शिंदे
- ‘मोदी सरकारने पीक विम्याचा हप्ता रोखला’, सचिन सावंत यांचा आरोप


