Share

‘मिळाली सत्ता घ्या गपगुमान ही काँग्रेसची अवस्था’

Published On: 

मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर जाऊन हाती शिवबंधन बांधून त्यांनी आज अधिकृतरित्या प्रवेश केला. २०१९ लोकसभा निवडणुकांवेळी उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवली होती. त्यांना पराभव पत्करावा लागल्यानंतर काँग्रेसला राम-राम ठोकून काही काळ राजकारणापासून पुन्हा दूर राहणं पसंत केलं होतं.

आता त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे. यासह शिवसेनेनं राज्यपालांच्या कोट्यातील आमदारकीसाठी देखील उर्मिला मातोंडकर यांची शिफारस केली आहे. दरम्यान, त्यांच्या या पक्षप्रवेशावर भाजपने टीकास्त्र सोडलं आहे. काही महिन्यांपूर्वी पारनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्या पुढाकाराने व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता.

यानंतर खुद्द शिवसेना प्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर राष्ट्रवादीतून त्या नगरसेवकांनी शिवसेनेत घरवापसी केली होती. हाच मुद्द्दा धरून भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. ‘मध्ये राष्ट्रवादीने शिवसेनेचे नगरसेवक नेले लगेच आघाडीचा धर्म सांगत शिवसेनेने आकांडतांडव केले व परत आणले आता काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर यांना पक्षात घेतले. बिचारी काँग्रेस पहा एक तरी नेतां तोंड उघडतो का? मिळाली सत्ता घ्या गपगुमान ही काँग्रेसची अवस्था आहे या तीन पक्षात!’ असा टोला देखील त्यांनी काँग्रेसला लगावला आहे.

काँग्रेस सोडून शिवसेनेत पक्षप्रवेशाबद्दल उर्मिला मातोंडकर म्हणतात…

काँग्रेस सोडून शिवसेनेत पक्षप्रवेश केल्याविषयी त्यांना प्रश्न केला असता, काँग्रेस सोडून मला १४ महिने झाले आहेत. बराच काळ गेला आहे. त्यामुळे १४ तासात पक्ष बदलल्यासारखं विचारू नका’ असं त्या म्हणल्या. तर, मी काँग्रेस सोडताना राजकारण सोडण्याचा उल्लेख केलेला नव्हता, लोकांसाठी काम करतच राहिले, जमिनीवर उतरुन काम करण्याची इच्छा असल्याचं देखील उर्मिला मातोंडकर यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!