सातारा:- सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या तोंडावर या निवडणुकांची चर्चा रंगत आहे. परंतु निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही राजेंच्या विरोधात स्वतंत्र पॅनल निश्चितपणे टाकणार आहे. महाविकास आघाडीचा फॉर्म्युला वरिष्ठ पातळीवरून आला तर तसाही निर्णय घेण्यात येईल, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ.शशिकांत शिंदे यांनी सातार्यात पत्रकार परिषदेत केली.
राष्ट्रवादी भवन सातारा येथे पत्रकारांशी बोलताना आ.शिंदे पुढे म्हणाले की, भाजपला सत्तेपासून दूर रहावे लागत असल्याने सरकारला अडचणीत आणणे, सरकार अस्थिर करणे, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणे, आरक्षणाच्या मुद्यावरुन समाजा-समाजात दरी निर्माण करणे एवढेच काम भाजप नेत्यांना उरले आहे. कोणतेही मुद्दे उपस्थित करुन राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा कुटील डाव भाजपकडून खेळला जात आहे. हे उद्योग त्यांनी आता थांबवावेत, असे आवाहनही आ.शिंदे यांनी केले आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक राजकारण विरहित ठेवण्याचा सर्वांचाच प्रयत्न आहे. आगामी निवडणुकीत तसा प्रयत्न राहू शकतो. जिल्हा बँकेत राष्ट्रवादी काँग्रेसचेच वर्चस्व आहे. मात्र, सहकारात राजकारण येऊ नये, अशी आमची कायमच भूमिका असल्याचे आ. शिंदे म्हणाले. भाजपने गेल्या ५ वर्षांत चांगल्या चाललेल्या सहकारी संस्था मोडीत काढण्याचेच काम केले. भाजपकडून समाजा-समाजात दरी निर्माण करुन आपली पोळी भाजून अस्थिरता निर्माण केली जात असल्याचा आरोप करुन आ.शिंदे यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-
रश्मी ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधून घेत उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत प्रवेश
-
विराटचा फिटनेस फ्रिक कायम ठेवत अनुष्काने गरोदरपणात केले शीर्षासन
-
लक्ष्मी विलास–डीबीएस विलिनीकरण अस्तित्वात; प्रत्यक्ष एकत्रित व्यवसायास प्रारंभ !
-
सरनाईकांचा क्वारंटाईन कालावधी संपला; लवकरच ईडी चौकशीला सामोरे जाणार?
-
महाविकास आघाडी सरकार त्यांचाच वजनाने पडेल; गिरीश बापटांची ठाकरे सरकारवर टीका!

