Share

पुजारीही अर्धनग्न अवस्थेत असतात मग् त्यांनाही मंदिरात प्रवेश नाकारणार का?

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना आता भारतीय संस्कृतीप्रमाणे पोषाख परिधान करावा लागणार आहे. अर्थात, याची सक्ती करण्यात आली नसून साईबाबा संस्थांनने भाविकांना अशी विनंतीवजा सूचना केली आहे. संस्थांच्या या निर्णयानंतर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी जोरदार टीका केली आहे. एखाद्या भक्तांच्या कपड्यावरून त्या व्यक्तीला तुम्ही ती व्यक्ती कशी आहे हे ठरू शकत नाही. शिर्डी संस्थाने घेतलेल्या निर्णय म्हणजे संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अवमान आहे, अशी टीका देसाई यांनी केली आहे.

कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी सरकारच्या आदेशानुसार १७ मार्चला शिर्डीचे श्री साईबाबा समाधी मंदिर साई भक्तांसाठी बंद करण्यात आले होते. तब्बल आठ महिन्यानंतर पाडव्याच्या मुहूर्तावर हे मंदिर भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे. शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना आता भारतीय संस्कृतीप्रमाणे पोषाख परिधान करावा लागणार आहे. अर्थात, याची सक्ती करण्यात आली नसून साईबाबा संस्थांनने भाविकांना अशी विनंतीवजा सूचना केली आहे. देशातील काही मंदिरांमध्ये असे निर्णय पूर्वीच घेण्यात आले. त्यातील काही ठिकाणी ते वादग्रस्तही ठरले होते. आता शिर्डी संस्थानने भाविकांना अशी सूचना दिली आहे. मंदिर परिसरात संस्थानने असे सूचनाफलक लावले आहेत.

दरम्यान, या निर्णयाचा निषेध करत देसाई पुढे म्हणाल्या की, शिर्डी येथील मंदिरातील अनेक पुजारी हे अर्ध नग्न अवस्थेत असतात. त्यामुळे कुठल्याही भक्ताने असे म्हटले नाही की पुजाऱ्यांना मंदिरात प्रवेश देऊ नका. त्यामुळे शिर्डी संस्थांने घेतलेला निर्णय हा पूर्णपणे भक्तांचा अपमान करणार आहे. त्यामुळे शिर्डी संस्थांने घेतलेला निर्णय तातडीने मागे घेण्यात यावा. आणि शिर्डी मध्ये जो बोर्ड लावला आहे तो त्वरित काढून टाकावा अन्यथा शिर्डी मध्ये येऊन आम्ही तो बोर्ड स्वतः काढू, असे देसाई म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!