मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौतचे मागील काही दिवसांपूसन राजकीय वाद चालू आहेत. या वादादरम्यान कंगणाच्या कार्यालयावर बीएमसीने कारवाई केली होती कंगनाचे कार्यालय तोडण्यात आले होते. सप्टेंबरमध्ये सुशांत सिंग राजपूत प्रकरण आणि कंगनाचे महाराष्ट्र सरकारवर टीका यावरून महाराष्ट्रातील वातावरण तापले होते. या रागातूनच ही कारवाई केल्याचा आरोप कंगनाने केला होता.
तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत शिवसेनेवर हल्लाबोल केला होता. यानंतर शिवसेनेविरुद्ध कंगना असा सामना रंगला होता. यातच तिला वाय प्लस सुरक्षा देखील पुरवण्यात आली होती. आजच, अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने शिवसेनेचं शिवबंधन बांधलं आहे. यानंतर तिने पत्रकार परिषद देखील घेतली.
यावेळी तिला कंगना रानौत बद्दल प्रश्न करण्यात आला असता, ‘कंगणा रणौत यांना उत्तर देणार नाही.त्यांच्यावर खूप बोलून झालं आहे, कंगनाला जास्त महत्त्व देण्याची गरज नाही. कंगनावर बोलण्याची ही वेळ नाही’ असं म्हणत सद्या तिच्यावर भाष्य करणं टाळलं. मात्र, येत्या काळात कंगना सारख्या महिला सेलिब्रिटींच्या टीकेला चोख उत्तर देण्यासाठी आता शिवसेना अधिक सज्ज झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
‘मी जन्माने हिंदू, माझा धर्म हिंदू; शिवसेना हिंदुत्ववादीच!’
साताऱ्यात दोन्ही राजेंच्या विरोधात राष्ट्रवादी ठोकणार शड्डू!
पवार साहेबांनी मला आमदार करायचं ठरवलं तर तुमच्या मतदानाची पण गरज नाही पडणार – खडसे
सर्वोत्कृष्ट गीतकार उदित नारायण यांचा ६५ वा जन्मदिवस
रखडलेल्या एमपीएससी परीक्षा, मेगाभरती त्वरित घ्या; काँग्रेस नेत्याचा सरकारला घरचा आहेर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

