जळगाव : भाजपला राम राम ठोकून राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा खांद्यावर घेणारे जेष्ठ नेते एकनाथ खडसे चांगलेच आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंत्तर महाराष्ट्रात भाजपला त्यांनी धक्के देण्यास सुरुवात केली होती. शेकडो कार्यकर्त्यांनी खडसेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची वाट धरली होती.
खडसेंनी भाजपविरोधात मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली असून त्यांनी भाजपला कोंडीत पकडण्यासाठी रणनीती आखल्याचं दिसून येत आहे. आता विधानपरिषदेतील राज्यपालनियुक्त सदस्यत्वाच्या मुद्द्यावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी तर्फे एकनाथ खडसेंच नाव राज्यपालांकडे पाठवण्यात आलं असून अद्यापही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यावर निर्णय घेतलेला नाही.
‘पवार साहेबांनी नाथाभाऊंना आमदार करायचे ठरवले तर तुमच्या मतदानाची गरज लागणार नाही,’ अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी जळगावमध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना दिली आहे. विधानपरिषदेतील आमदारकीविषयी त्यांना विचारलं असता भाजपला त्यांनी टोला लगावला आहे.
दरम्यान, बीएचआर सहकारी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी कारवाई सुरू असतांना एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी सदर प्रकरणात पाठपुरावा करणाऱ्या ॲड. किर्ती पाटील देखील उपस्थित होत्या.आता यातील सर्व सत्य बाहेर येणार असून, या प्रकरणात बड्या नेत्याचे नाव असून ज्याचा संबंध मंत्र्यांशी राहिला असल्याचा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत केला.
महत्वाच्या बातम्या
महागाईमूळे व्याजदर राहू शकतात ‘जैसे थे’, उद्यापासून रिझर्व बँकेची आढावा बैठक…
साताऱ्यात दोन्ही राजेंच्या विरोधात राष्ट्रवादी ठोकणार शड्डू!
एकाही केंद्रीय मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही, त्याची कॉलर पकडून जाब विचारणार – शेट्टी
सर्वोत्कृष्ट गीतकार उदित नारायण यांचा ६५ वा जन्मदिवस
धनंजय मुंडे म्हणाले विजय आमचाचं; प्रीतम मुंडे म्हणतात गुलाल आमचाचं!


