नाशिक : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला असून रेकॉर्डब्रेक रुग्णसंख्या नोंदवण्यात आली आहे. दरम्यान, गर्दी होऊ नये व त्यातून रुग्णसंख्या वाढू नये या साठी कडक निर्बंध लागू करण्यात आले असून प्रार्थनास्थळे देखील बंद करण्यात आले आहेत. दरम्यान, आता रुग्णांचा आलेख हा काहीसा उतरता असून येत्या काही दिवसांमध्ये लॉकडाऊन टप्प्याटप्याने हटवण्यात येईल असे संकेत सरकारकडून दिले जात आहेत.
दरम्यान, कोरोना संसर्गामुळे मागील वर्षीपासून आषाढी वारी सह कार्तिकी, माघी आणि वारकरी संप्रदायात विशेष महत्व असलेल्या सोहळ्यांवर देखील निर्बंध लावण्यात आले असून मर्यादित स्वरूपात कार्यक्रम केले जात आहेत. दरम्यान, आता यंदाच्या वर्षी देखील कोरोनाच सावट कायम आहे. मात्र, अनेक शतकांची परंपरा असलेल्या पायी वारी ला परवानगी द्यावी यासाठी भाजप अध्यात्मिक आघाडी आक्रमक झाली आहे.
यावर्षी पायी वारी झालीच पाहीजे, त्या बाबतीत आम्ही कोणतीही तडजोड स्वीकारणार नाहीत
समस्त वारकरी संप्रदायाची तीव्र इच्छा आहे की निर्बंधासह का असेना पण पायी वारी व्हावी. मुख्यमंत्र्यांनी वेळकाढूपणा न करता त्वरीत वारकर्यांसोबत चर्चा करुन नियमावली तयार करावी. – भाजप आध्यात्मिक आघाडी pic.twitter.com/xZuDLXR3s3— Acharya Tushar Bhosale (@AcharyaBhosale) June 4, 2021
‘यावर्षी पायी वारी झालीच पाहीजे, त्या बाबतीत आम्ही कोणतीही तडजोड स्वीकारणार नाहीत समस्त वारकरी संप्रदायाची तीव्र इच्छा आहे की निर्बंधासह का असेना पण पायी वारी व्हावी. मुख्यमंत्र्यांनी वेळकाढूपणा न करता त्वरीत वारकर्यांसोबत चर्चा करुन नियमावली तयार करावी,’ अशी मागणी महाराष्ट्र भाजप अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे. दरम्यान, मंदिर संस्थाने व प्रशासनाच्या बैठका सुरु असून याबाबतीत काय निर्णय होणार याकडे लाखो वारकऱ्यांचे लक्ष लागून आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘उद्या बीडमध्ये निघणारा मोर्चा मराठा समाजाचा नव्हे तर..’, काँग्रेसचे वादग्रस्त वक्तव्य
- मराठा आरक्षणाच्या मोर्चावरून आ.मेटे आणि बीड प्रशासन आमनेसामने
- ‘सरकारमध्ये विसंवाद नाहीये, पण समन्वय वाढवावा लागेल’, ‘त्या’ गोंधळानंतर थोरातांची प्रतिक्रिया
- ‘..ताकतच पहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू’, संभाजीराजेंचा इशारा
- ‘आरक्षणावर अजित पवारांसारखे मराठा मंत्री गप्प असणे हे आश्चर्यकारक’


