नाशिक : २०१४ मध्ये भाजपने केंद्रासह महाराष्ट्रात देखील सत्तास्थापन केली होती. यानंतर, भाजपमध्ये जोरदार इनकमिंग झाली होती. मात्र, २०१९ मध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळून देखील शिवसेनेनं साथ सोडल्यामुळे विरोधी पक्षात बसावं लागलं आहे. तर, शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाऊन महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं.
यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. तत्कालीन मुख्यमंत्री व सद्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या राजकीय पर्वाचा अस्त झाल्याचं भाष्य केलं होतं. त्यांची पद्धत महाराष्ट्राने नाकारली आहे त्यामुळे त्यांनी आता रिटायर्ड व्हावं, असं देखील एका मुलाखतीमध्ये ते म्हणाले होते. यानंतर, फडणवीसांनीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रहार केला आहे. दोन दिवसांपूर्वी नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होत्या. “देवेंद्र फडणवीस म्हणाले होते शरद पवारांनी रिटायर्ड व्हावं. छान मार्गदर्शन केलं होतं. मात्र महाराष्ट्राने शरद पवारांना रिटायर्ड करायचं नाही हे ठरवलं होतं. त्यामुळे ‘एक देवेंद्र फडणवीस क्या करेगा ? महाराष्ट्र एक तरफ और देवेंद्र फडणवीस एक तरफ’. शरद पवार म्हटले असते मी आता देवेंद्र फडणवीस बोलत आहेत तर रिटायर्ड होतो, परंतु महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात तसं नाही.” असं भाष्य सुप्रिया सुळे यांनी केलं होतं.
सुप्रिया सुळेंच्या या टीकेला भाजप अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ८० वर्षीय राष्ट्रीय अध्यक्षाला आजही ‘प्रांताध्यक्षा’ सारखे राज्यातच गुंतवून ठेवले आहे आणि फडणवीसांनी एकट्यानेच १०५ निवडून आणले; जे शरद पवारांना आजपर्यंत जमले नाही. महाराष्ट्राने रिटायर्डच केले पण पंतप्रधानपदाची आस साहेबांना स्वस्थ कुठे बसू देते ?’ अशी जहरी टीका तुषार भोसले यांनी केली आहे.
@supriya_sule, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ८० वर्षीय राष्ट्रीय अध्यक्षाला आजही 'प्रांताध्यक्षा' सारखे राज्यातच गुंतवून ठेवले आहे आणि एकट्यानेच १०५ निवडून आणले ; जे @PawarSpeaks ना आजपर्यंत जमले नाही. महाराष्ट्राने रिटायर्डच केले पण पंतप्रधानपदाची आस साहेबांना स्वस्थ कुठे बसू देते ? pic.twitter.com/P1JMQvLF8y
— Acharya Tushar Bhosale (@AcharyaBhosale) February 21, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- मुकेश अंबानी उभारणार जगातील सर्वात मोठं प्राणी संग्रहालय
- जालनेकरांनो काळजी घ्या! जिल्ह्यात कोरोना वाढतोय; शनिवारी तिघांचा बळी; ७० नवे रुग्ण
- अल्लाह को पता था कोरोना आनेवाला है – जितेंद्र आव्हाड
- ‘उद्धवजींचे सरकार नाही रामाचे…नाही भिमाचे…नाही काही कामाचे’
- पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या, बीड जिल्ह्यातील घटना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

