Share

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप – आरपीआयची नवी रणनीती

Published On: 

मुंबई: भाजप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आगामी मुंबई महापलिकेच्या (Mumbai municipal corporation) निवडणुकीसाठी नवीन रणनीती आखत असल्याचे चित्र समोर येत आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athavle) यांच्यात यासंदर्भात चर्चा झाली. आगामी मुंबई महानगर पालिका निवडणूकीत दोन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

निवडणुका तोंडावर आल्यामुळे आता सर्वच पक्ष मोर्चेबांधणी करत असल्याचे चित्र सध्या राज्यभरात दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे देखील मिशन विदर्भा करत आहेत. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भयात शरद पवार यांनी दौरा केला. त्यामुळे एकंदरीतच निवडणुका लक्षात घेता सर्वच पक्ष चांगलेच तयारीला लागले असल्याचे चित्र राज्यभरात बघायला मिळत आहे.

दरम्यान, कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी देखील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या पूर्वी देखील नाना पटोले यांनी फडणविसांची भेट घेतली होती. बिनविरोध निवडणूक लढवण्यासाठी या भेटी होत असल्याचे बोलले जात आहे. आता भाजप आणि आरपीआय हे दोन्ही पक्ष मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!