मुंबई: कंगना राणावतने (Kangana Ranaut) एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. ‘भारताला १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती भीक होती, खरे स्वातंत्र्य हे २०१४ साली मिळाले’, असं वक्तव्य कंगनाने केलं होतं. यावरुन कंगनावर टीका केली जात आहे. असे असताना कंगनाने केलेल्या स्वातंत्र्याबद्दलच्या वक्तव्याचं गोखलेंनी समर्थन केलं होते. यावरून विक्रम गोखले यांच्यावरही प्रचंड टीका करण्यात आली.
यानंतर आता विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी आज पत्रकार परिषद घेत ‘खोट्या धर्मनिरपेक्षतेला माझा विरोध आहे. मी धिक्कार करतो. माझा त्यांच्यावर विश्वास बसणार नाही. स्युडो सेक्युलर लोकांना वाटतं की मी ठराविक लोकांच्या बाजूनं बोलतो. पण मी विद्यमान सरकारच्या विरोधातही जाहीरपणे बोलतो, असं गोखले म्हणाले आहे.
‘सत्तेची भूक लागलेले जे राजकीय नेते किंवा पक्ष आहेत. त्यांना हा देश एकसंध राहावा हे सहन होत नाही. अमेरिकेनं ज्यांना व्हिसा नाकारला, त्यांचा सन्मान होतोय हे त्यांना पाहवत नाही. एक माणूस, एक पक्ष काही तरी करतोय म्हटल्यावर तो लोकप्रिय होणारच. आमचं काय होईल असं वाटून इतर भुंकायला सुरुवात करतात, असं म्हणत, विक्रम गोखले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचं कौतुक केलं. ‘
तर पुढे भाजप आणि शिवसेना एकत्र येण्याच्या वक्तव्यावर ते म्हणाले, ‘काही राजकीय पक्षांत चांगली माणसं आहेत. त्याबद्दल मी चांगलंच बोलतो. जे चांगलं ते चांगलं. वाईट फेकून द्या अशा मताचा मी आहे. या देशाचे तुकडेच झाले पाहिजेत. इथे कम्युनिझम आलं पाहिजे अशी काही लोकांची इच्छा आहे. याला माझा विरोध आहे. भाजप आणि शिवसेनेनं पुन्हा एकत्र यावं ही माझी इच्छा आहे,’ असही गोखले म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- ‘आंदोलन मागे घेतले जाणार नाही, जोपर्यंत..’, टिकैत यांचा मोदींना इशारा
- शरद पवारांनी ‘हा’ दुतोंडीपणा बंद करावा- अतुल भातखळकर
- ‘…म्हणून तुम्ही रोहित शर्मा, विराट कोहली किंवा केएल राहुलला बाहेर काढू शकत नाही’
- ‘..हा मोदी सरकारच्या अत्याचारावर शेतकऱ्यांच्या लढाऊ वृत्तीचा आणि एकजुटीचा विजय’
- शरद पवारांनी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर फडणवीसांचं सडेतोड उत्तर


