औरंगाबाद :औरंगाबाद जिल्ह्याची ओळख उद्योग नगरी म्हणून प्रसिद्ध आहे. याठिकाणी अधिकाधिक उद्योग यावेत, यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. शिवाय जिल्ह्यातील विविध उद्योजकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी प्रशासनाकडून सर्वोतोपरी मदत करण्यात येणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Sunil chavan) यांनी उद्योजकांना दिली. आवश्यक त्या समस्यांवर उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash desai) यांच्या अध्यक्षतेखाली उद्योजकांची बैठक बोलावून समस्यांचे निराकरण करण्यात येईल, अशी ग्वाही उद्योजकांना यावेळी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे (Anant gavhane), जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप रोकडे (Sandip rokde), महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी राजेश जोशी (Rajesh joshi) आदींसह विविध उद्योग संघटनांचे पदाधिकारी, उद्योजकांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी यांनी उद्योजकांच्या सर्व समस्या ऐकून घेऊन त्या तत्काळ सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेशित केले. उद्योजकांनी औरंगाबाद, पुणे महामार्गावरील छावणी परिसरातील उड्डाणपूल येथे मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.
या पुलाचे व रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करण्यात यावे. साजापूर ते एमआयडीसी वाळूज रस्त्याची जोडणी, ओऍसिस चौकात उड्डाणपूल बांधणे, एमआयडीसी क्षेत्रा बाहेरील गट नंबरमध्ये असलेल्या उद्योजगांना सोयीसुविधा उपलब्ध करणे, ग्रामंपचायत कर आकारणी सुलभ करणे, वाळूज औद्योगिक परिसरातील गट नंबर, चिकलठाणा एमआयडीसी क्षेत्रात उद्योगांना मुलभूत सुविधा, आवश्यक परवाने, दर्जेदार रस्ते, वीज, पाणी पुरवणे, शेंद्रा औद्योगिक क्षेत्रामध्ये एमआयडीसीने राखीव ठेवलेल्या जागेवर स्वतंत्र पोलिस स्टेशनची निर्मिती करणे, चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रातील कचरा नियमित उचलण्यात यावा आदी उद्योजकांच्या समस्यांवर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी कार्यवाही करण्याचे आदेश संबंधितांना दिले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘जीता किसान हारा अभिमान, आंदोलनजीवी म्हणत शेतकऱ्यांना हिणवणाऱ्या मोदींनी माफी मागावी’
- मोदींच्या निर्णयावर विश्वास कसा ठेवायचा?- प्रियंका गांधी
- …हा शेतकऱ्यांच्या धैर्याने दिलेल्या लढ्याचा विजय- धनंजय मुंडे
- …परंतु ही केवळ यूपी, पंजाबच्या निवडणुकीसाठीची नौटंकी तर नाही ना?- विजय वडेट्टीवार
- कृषी कायद्यासंदर्भात चंद्रकांत पाटलांची पंतप्रधानांना ‘ही’ विनंती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

