Share

‘आता पुढचे निर्णय घेताना तरी विश्वासात घ्या’

Published On: 

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज तीन कृषी कायदे (Farm Law) मागे घेण्याची घोषणा केली आहे. गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. आम्ही शेतकऱ्यांना कृषी कायदे समजाऊन सांगण्यात कमी पडलो, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी देखील मागितली आहे. त्याच सोबत सर्व शेतकऱ्यांना आता परत घरी जाण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे. मात्र शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

केंद्र सरकारने तीन कृषी कायदे लागू केल्याची घोषणा केल्यानंतर या कायद्यांना प्रचंड विरोध झाला. शेतकरी संघटनांनी हे कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी दिल्लेच्या सीमेवर ठिया मांडला होता. अनेक स्तरांवरून या कायद्यांना विरोध करण्यात येत होता. मात्र आता शेतकऱ्यांचे आंदोलन अधिक काळ सुरू न ठेवता यावर तोडगा म्हणून अखेर मोदी सरकारने हे तीनही कृषी कायदे मागे घेण्याचा मोठा निर्णय आज घेतला. कृषी कायद्यांमध्ये घेतलेला हा यू-टर्न बघून विरोधकांकडून चांगलेच टोमणे मोदी सरकारवर मारण्यात येत आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र त्याच सोबत ठाकरेंनी मोदी सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीनं या कृषी कायद्यांविरुद्ध आपली भूमिका असल्याचं वारंवार सांगितलं आहे. शिवाय मंत्रिमंडळात, विधिमंडळात देखील या कायद्याच्या दुष्परिणामावर चर्चा केली असल्याचे ठाकरेंनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या या निर्णयावर आणखी बोलताना उद्धव ठाकरे यांनी टोमणा लगावला आहे, ते म्हणाले, केंद्राने यापुढं असे कायदे आणण्यापूर्वी सर्व विरोधी पक्ष तसेच संबंधित संघटना यांना विश्वासात घेऊन संपूर्ण देशाच्या दृष्टीने हिताचा निर्णय घ्यायला हवेत. म्हणजे आज जी नामुष्की ओढवली आहे असं पुढे होणार नाही, असा टोमणा त्यांनी लगावला आहे. आता हे कायदे मागे घेण्याची तांत्रिक प्रक्रिया देखील लवकरात लवकर होईल, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!