🕒 1 min read
मुंबई : कोरोना काळात अनेक संकटांना तोंड देता देता सर्वसामान्य नागरिकांचं कंबरडं मोडलं. त्यात केंद्र सरकारने महागाईचा भडका उडवला जात आहे. दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेल, गॅस यांच्या दरात वाढ करणं सुरुच आहे. सत्ताधारी भाजपवर सर्व सामान्य जनतेकडून रोष व्यक्त केला जात असतानाच आता भाजपच्या एका नेत्याने नागरिकांना अजब सल्ला दिला आहे.
देशात पेट्रोल २०० रुपये प्रतिलीटर झालं तर मोटारसायकवरुन ट्रिपल सीट प्रवास करावा असा संतापजनक सल्ला भाजपा नेत्यानं दिला आहे. त्यावरुन काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजप नेत्याच्या सल्ल्यावरुन केंद्रावर टीकेची झोड उठवली आहे.
जखमेवर मीठ चोळणे असा एक वाक्यप्रचार आहे. पण भाजप नेते तर महागाईने होरपळणा-या सर्वसामान्य जनतेच्या जखमेवर ११४ रुपये लिटरचे पेट्रोल ओतून आग लावत आहेत. पेट्रोल २०० रुपये लीटर झाल्यास ट्रिपल सीट प्रवास करा, भाजप नेत्याचा संतापजनक सल्ला, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हंटल आहे. याबाबत त्यांनी ट्वीट केलं आहे.
जखमेवर मीठ चोळणे असा एक वाक्यप्रचार आहे. पण भाजप नेते तर महागाईने होरपळणा-या सर्वसामान्य जनतेच्या जखमेवर ११४ रुपये लिटरचे पेट्रोल ओतून आग लावत आहेत.
पेट्रोल २०० रुपये लीटर झाल्यास ट्रिपल सीट प्रवास करा, भाजप नेत्याचा संतापजनक सल्ला..https://t.co/9Z2mXkd0Ro@INCMaharashtra
— Balasaheb Thorat (@bb_thorat) October 21, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मेळावे घेणे, चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर देणे यापलीकडं रुपालीताईंनी महिलांसाठी केलंय तरी काय?’
- तुमच्याकडे तपास यंत्रणा, शोधू शकता; मनिषा कायंदेंचं अमृता फडणवीसांना उत्तर
- … म्हणून चिखलीच्या नगराध्यक्षांसह पतीची भाजपातून करण्यात आली हकालपट्टी
- याला राज्य सरकारच दोषी; रावसाहेब दानवेंनी कोळसा टंचाईचं फोडलं खापर ठाकरे सरकारवर
- ‘…हे कुठले डॉन आहेत का?’; जास्मिन वानखेडेंवरील आरोपानंतर मनसे आक्रमक
- ‘आज हमारी तो कल तुम्हारी बारी’; ईडी कारवाईवरुन विजय वडेट्टीवारांचे चंद्रकांत पाटलांना उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
