मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वांनीचं त्याचं मनःपूर्वक अभिनंदन केलं आहे. तसेच महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी नक्कीच उल्लेखनीय काम कराल असा विश्वास व्यक्त करत अनेकांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर काहीनी त्यांच्यावर टीकाही केली आहे. मनसेने चाकणकरांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
‘मेळावे घेणे आणि चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर देणे यापलीकडे रुपालीताईंनी महिलांसाठी केलंय तरी काय..?, असं म्हणत मनसेने निशाणा साधला आहे. मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी रुपाली चाकणकर यांना खोचक टोला लगावला आहे. याबाबत शालिनी ठाकरेंनी ट्विट केलं आहे.
‘सरकार स्थापन होऊन २ वर्षांनी महिला आयोगाचा अध्यक्ष नेमण्याला मुहूर्त मिळाला ही बाब आनंदाची आहे. पण मेळावे घेणे आणि चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर देणे यापलीकडे रुपालीताईंनी महिलांसाठी केलंय तरी काय..?, असं शालिनी ठाकरे यांनी म्हटलं आहे. याआधी देखील मनसेने विविध मुद्द्यांवरून ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
सरकार स्थापन होऊन २ वर्षांनी महिला आयोगाचा अध्यक्ष नेमण्याला मुहूर्त मिळाला ही बाब आनंदाची आहे. पण मेळावे घेणे आणि चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर देणे यापलीकडे रुपालीताईंनी महिलांसाठी केलंय तरी काय..?#mnsadhikrut
— Shalini Thackeray (@ThakareShalini) October 21, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- तुमच्याकडे तपास यंत्रणा, शोधू शकता; मनिषा कायंदेंचं अमृता फडणवीसांना उत्तर
- … म्हणून चिखलीच्या नगराध्यक्षांसह पतीची भाजपातून करण्यात आली हकालपट्टी
- याला राज्य सरकारच दोषी; रावसाहेब दानवेंनी कोळसा टंचाईचं फोडलं खापर ठाकरे सरकारवर
- ‘…हे कुठले डॉन आहेत का?’; जास्मिन वानखेडेंवरील आरोपानंतर मनसे आक्रमक
- ‘आज हमारी तो कल तुम्हारी बारी’; ईडी कारवाईवरुन विजय वडेट्टीवारांचे चंद्रकांत पाटलांना उत्तर


