Share

‘भाजप लढण्यासाठी कधीच स्वत:चं हत्यार वापरत नाही, त्यांच्याकडे…’

Published On: 

औरंगाबाद : महागाईविरोधात औरंगाबादमध्ये शिवसेनेकडून आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाला मनसेनं विरोध केल्याच्या मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

पत्रकारांशी संवाद साधत असतांना मनसेच्या माध्यमातून भाजपाच सूत्र हलवत आहे का? असा प्रश्न विचारला असता राऊत भाजपाकडे स्वत:चं हत्यारच नाही असे म्हणाले. तसेच, मनसेचं नाव न घेता भाडोत्री राजकीय पक्ष हाताशी धरून आम्हाला विरोध केला जातो, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’भाजपा लढण्यासाठी कधीही स्वत:चं हत्यार वापरत नाहीत. त्यांच्याकडे स्वत:चं हत्यारच नाही. ते दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवतात. खांदेही पिचलेले असतात. खांदेही मजबूत नसतात. त्यामुळे त्यांचा प्रत्येक बार फुसका ठरतो. कधी बॉम्ब फोडणार म्हणतात, पण लवंगी फटाकाही फुटत नाही. कधी ईडी-सीबीआयच्या घोषणा करतात. पण तिथूनही काही मिळत नाही. भाडोत्री राजकीय पक्ष हाताशी धरून आम्हाला विरोध केला जातो. शिवसेना हा एक हत्ती आहे. हत्ती चालत असतो. पण पाठीमागून कोण भुंकत असतो, त्याकडे लक्ष देण्याचं कारण नाही.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!